Homeआरोग्यशेतकऱ्यांसह कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित असलेल्यांना आवश्यक सुविधा बाजार समितीने उपलब्ध...

शेतकऱ्यांसह कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित असलेल्यांना आवश्यक सुविधा बाजार समितीने उपलब्ध करून द्याव्यात -मंत्री छगन भुजबळ

मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत बाजार समितीने तयार केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव हे कांद्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध ठिकाण असून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला’अ’ चार तारांकित दर्जा आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांसह बाजार समितीशी निगडित विविध घटकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत बाजार समितीने तयार केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते आज दि.20 जुलै 2025 रोजी दुपारी करण्यात आले. यावेळी लासलगावच्या सरपंच योगिता पाटील, बाजार समितीचे सभापती डी.के.जगताप, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, उपसभापती संदीप दरेकर, संचालक जयदत्त होळकर आदी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले, की या भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या चिंचोडी, ता.येवला येथील क्षेत्रात 50 एकर जागेत कांदा प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये नाशिकसह परिसरातील सहा जिल्ह्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येतात. त्यांच्यासाठी विविध सुविधा आवश्यक आहेत. त्यासाठी विंचूर सुभाषनगर येथील जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे, तर उपबाजार खाणगाव येथील जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी पणन विभागाच्या प्रधान सचिवांशी बोलणे झाले आहे.
येवला, निफाड परिसरात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक आणि जनहिताच्या या कामांना नागरिकांनी सहकार्य करावे, असेही मंत्री भुजबळ यांनी आवाहन यावेळी केले. होळकर, माजी सभापती सुवर्णा जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र ढोकळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!