Homeउद्योगविविध प्रलंबित मागण्यांसाठी भुसावळ नगर परिषदेवर सफाई कामगार संघटना एकवटली

विविध प्रलंबित मागण्यांसाठी भुसावळ नगर परिषदेवर सफाई कामगार संघटना एकवटली

नगरपालिका प्रशासनाकडून अनेक सेवानिवृत्त कामगारांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्याचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित..

पोलीस वार्ता, भुसावळ : नगरपरिषदेच्या आस्थापना विभागामार्फत सफाई कामगारांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून याबाबत, आज अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश सचिव संतोष थामेत यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या सफाई कामगारांनी नगरपालिकेवर धडक देत, घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध गंभीर आरोप केलेले आहेत. सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे विविध प्रकारचे लाभ जसे की, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी, व इतर रकमांबाबत, नगरपरिषदेकडे वारंवार मागणी करूनही मिळत नसून हेलपाटे मारावे लागत आहे. संघटनेचे प्रदेश सचिव संतोष थामेत यांच्या नेतृत्वात आज झालेल्या पत्रकार परिषदेत सफाई कामगारांनी अनेक गंभीर आरोप करत पैसे देऊनही संबंधित अधिकारी यांचे कडून त्यांचे पगार, पेन्शन, सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांच्या रकमांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे भुसावळ शहराची वर्षानुवर्षे स्वच्छता करून सेवा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

नगरपालिका प्रशासनाकडून अनेक सेवानिवृत्त कामगारांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्याचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित असून अनेक महिन्यांपासून या लाभाच्या रक्कमा मिळण्यास विलंब होत आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित वेतनाची पगार स्लीप देखील दिली जात नसल्याचा मुद्दा देखील यावेळी चर्चेत आलेला आहे. तसेच काही मयत झालेल्या माजी कर्मचाऱ्यांच्या वारसांना देखील विविध लाभांपासून वंचित ठेवण्यात येत असून त्यांची प्रकरणे अनेक महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आलेली असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
  • सर्व मागण्या पूर्ण करू – प्रांताधिकारी..
याप्रकरणी भुसावळ नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी श्री.जितेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, सफाई कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे वारस हे नगरपालिका प्रशासनाचे अत्यंत महत्त्वाचे कर्मचारी असून जर त्यांना अशा गंभीर समस्या येत असतील, तर त्यांचे तात्काळ निवारण करण्यात येईल. याबाबत येत्या सोमवारी प्रशासकीय बैठक लावण्यात येईल आणि जर कोणी अधिकारी कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक विविध प्रकारच्या कामांसाठी आणि प्रस्तावांसाठी विनाकारण दिरंगाई करत असेल तर, संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.

✍️पोलीस वार्ता न्यूज टीम : भुसावळ..
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!