आकोट ( प्रियंका केदार ) तालुक्यातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा मार्च २०२५ चा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून आकोट येथील शिक्षण संस्था मध्ये सुप्रसिद्ध वसुंधरा इंग्लिश हायस्कूलने १०० % निकालाची मालिका कायम राखली आहे.शाळेतून गुणानुक्रमे कुमारी धनश्री चंद्रशेखर हिंगणकर ही विद्यार्थीनी ९५.६० % गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.कुमारी कृष्णाली गोपाल नारे ही ९३.८० % गुण मिळवून द्वितीय तसेच शिवराज अतुल वाघ व पुर्वा संजय वाकळे या दोघांनी ९३.६० % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत.

यावर्षी इयत्ता दहावीत एकूण ४० विद्यार्थ्यांपैकी ९० % च्या वर १३ विद्यार्थी तर ८० % च्या वर १२ विद्यार्थ्यांनी गुण मिळवत आपल्या यशाची चुणूक दाखवली आहे.सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या आई-वडिलांना
संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव कुलट , सचिव वसंतराव पुंडकर,कोषाध्यक्ष अरुण सांगळोदकर,संचालक प्रशांत वाघ,मुख्याध्यापक शिवचरण नारे व इतर मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना दिले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यां चे कौतुक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रदेश अध्यक्ष कैलाश बापुजी देशमुख , राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर जी सुने , केंद्रीय संपर्क प्रमुख रमाकांत मोरे, अकोट तालुका सामाजिक मंच निलेश खंडेराव,तालुका अध्यक्ष चंचल पीतांबर वाले , अकोला जिल्हा अकोट तालुका कार्याध्यक्ष व महाराष्ट्र पोलिस वार्ता टीवी चैनल मध्य प्रदेश राज्य येथील न्युज चैनल गुना एचडी डिजिटल टाइम्स , इंडिया तक न्युज़ चैनल चे विदर्भ हेड प्रियंका रमेश केदार विदर्भ कार्याध्यक्ष , प्राध्यापक व डॉक्टर मंजुषा सागर , संचयनी बरठीया , शालिनी शर्मा परतवाड़ा , पुजा पाटील यवतमाळ शहर अध्यक्ष , डॉक्टर रमेश थोरात अकोला , थोरात मैडम जी तर्फे सर्व शालेय विद्यार्थांचे कौतुक करण्यातआले आहे ।




































