परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या तक्रारीची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दखल..
पोलीस वार्ता, जळगाव : माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 ची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबाबत वारंवार सूचना व शासन परिपत्रक निर्गमित करूनही अपेक्षित सुधारणा कामकाजात दिसून न आल्याने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका क्र. 990/2021 दाखल केली होती. या याचिकेवर दि.17 ऑगस्ट 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने तसेच राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या 22 डिसेंबर 2023 च्या शिफारशी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 4 मार्च 2024 रोजी कलम 4 च्या अंमलबजावणी संदर्भात शासन परिपत्रक जारी केले होते.
या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने दखल घेतली आहे. त्यानुसार नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर आणि नाशिक या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व संबंधित विभागप्रमुखांना आवश्यक अंमलबजावणीसाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
सदर शासन परिपत्रकात कलम 4 अंतर्गत “Proactive Disclosure” अर्थात नागरिकांना माहिती स्वयंप्रेरणेने उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय “कलम 4 समन्वय अधिकारी” (Nodal Officer) म्हणून जबाबदारी देण्यात आली असून सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये कलम 4 ची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
परिपत्रकानुसार केवळ औपचारिक माहिती प्रसिद्ध न करता तिची गुणवत्ता, संपूर्णता आणि नियमित अद्ययावतता आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अंमलबजावणीचा तृतीय पक्ष पारदर्शक ऑडिट (Third Party Audit) करून त्याचा अहवाल वार्षिक स्वमूल्यांकनामध्ये समाविष्ट करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी प्रभावी न झाल्यास पुढील टप्प्यात राज्य माहिती आयोग तसेच उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं
विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित
बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक..
पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...