बारामती व परळी अश्या दोन्ही भागातील पशुपालन आणि कृषी क्षेत्रात मोठी चालना मिळणार आहे. प्रत्येक महाविद्यालयासाठी 564.58 कोटी रुपये प्रदान केले गेले आहेत..

पोलीस वार्ता, बारामती : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत बारामतीसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीत नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय उपमुख्यमंत्री व पुणे पालकमंत्री अजीतदादा पवार यांच्या प्रयत्नांतून सुरू होणार आहे. याची घोषणा अजित पवार यांनी ‘कृषिक 2025’ प्रदर्शनावेळी जानेवारीत केली होती आणि महिनाभरातच मंजुरी प्राप्त करून दिली आहे. यात बारामती आणि परळी (बीड) असे दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयांची स्थापनेची मंजुरी दिली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती व परळी अश्या दोन्ही भागातील पशुपालन आणि कृषी क्षेत्रात मोठी चालना मिळणार आहे.

पुणे जिल्ह्यात दुग्धव्यवसाय आणि शेती पूरक पशुपालन उद्योग मोठ्या प्रमाणावर होतो, पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे या क्षेत्रांना आणखी बळ मिळेल. शेतकऱ्यांसाठी आणि जनावरांचे मालकांसाठी शोध आणि प्रशिक्षण केंद्र म्हणूनही कार्य करेल. हे महाविद्यालय अत्याधुनिक संशोधन आणि आरोग्य सेवा प्रदान करेल, ज्याचा फायदा पुणे आणि शेजारील जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना होईल.
यापुढे उच्च दर्जाचे पशुवैद्यकीय शिक्षण, प्रशिक्षण, आणि जनावरांसाठी आरोग्य सेवा मिळेल अशी अपेक्षा आहे. पहिले येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. पुण्यात आधीच महात्मा फुले कृषी विद्यापीठासारखे काही प्रमुख कृषी संस्थांचे आहेत. बारामतीतील नव्याने तयार होणाऱ्या महाविद्यालयामुळे हा ताण कमी होणार आहे.
कसे असेल नव्याने तयार होणारे पशुवैद्यकीय महाविद्यालय!
-
बारामती येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय 82 एकर जागेवर उभारले जाईल.
-
ज्यात वर्गखोल्या, लॅबोरेटरी, संशोधन केंद्रे आणि जनावरांची काळजी घेणारी सुविधा विकसित करण्यासाठी पुरेशी जागा असेल.
-
महाविद्यालयात दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, आणि शेती व्यवस्थापनासाठी विशेष प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध होतील.
-
महाराष्ट्र सरकारने दोन्ही पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी 1129.16 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे,
-
प्रत्येक महाविद्यालयासाठी 564.58 कोटी रुपये प्रदान केले गेले आहेत.
-
मिळणाऱ्या निधीचा उपयोग अत्याधुनिक संशोधन केंद्रे, प्रगत लॅबोरेटरी आणि चांगल्या दर्जाचे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी होईल,
-
प्रत्येक महाविद्यालयासाठी 234 शासकीय कर्मचारी पदे असतील त्यात 96 अध्यापक, 138 अकादमीक कर्मचारी व अतिरिक्त शिक्षक आणि 42 सहाय्यक कर्मचारी पदे असतील.






































