Homeआरोग्ययवतमाळ जिल्ह्यात पोलीस दलाकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन, सहा दिवसात 1320 जणांनी दिल्या...

यवतमाळ जिल्ह्यात पोलीस दलाकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन, सहा दिवसात 1320 जणांनी दिल्या मुलाखती!

दि.17 फेब्रुवारी, सकाळी 9 वाजेपासून सुरू झालेल्या या रोजगार मेळाव्याचा शेवट आज दि.22 फेब्रुवारी, शनिवार सायं 5 वाजता झाला.

पोलीस वार्ता, यवतमाळ : जिल्हा पोलीस दलाचे वतीने ‘रोजगार मेळावा-ऑपरेशन प्रस्थान’ हा उपक्रम यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यात दि.17 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2025 दरम्यान राबविण्यात आला.
‘ऑपरेशन प्रस्थान’ हे सुरक्षारक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षक या पदाकरीता आहे. याचा उद्देश्य गुन्हेगारी, व्यसन व वाईट मार्गाकडे वळणाऱ्या तरुण पिढीला रोखण्यासाठी तसेच शाळा व कॉलेज सोडलेल्या तरुणांना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आहे. यवतमाळ पोलीस दलाकडून पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला.

दि.17 फेब्रुवारी, सकाळी 9 वाजेपासून सुरू झालेल्या या रोजगार मेळाव्याचा शेवट आज दि.22 फेब्रुवारी, शनिवार सायं 5 वाजता झाला. मेळाव्यात जिल्ह्यातील यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, नेर, दिग्रस, आर्णी, उसद, उमरखेड, महागांव, पांढरकवडा, राळेगाव, घाटंजी, वणी, मारेगांव, झरी जामणी या सर्व तालुक्यातील उमेदवारांसाठी मुलाखतीची तारीख व ठिकाण याचे वेळापत्रक जिल्हा पोलीस दलाकडून पहिलेच प्रसारित केले होते. ठिकाण वेगवेगळे असले तरी सर्व मुलाखती या सकाळी 9 ते सायं 5 वाजेच्या दरम्यानच घेण्यात आल्या
वणी येथे जि.पो. अधीक्षक श्री कुमार चिंता सो. यांचे संकल्पनेतून व अप्पर पो. अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप सो. यांचे मार्गदर्शनात या संपूर्ण मेळाव्याचे आयोजन केले होते. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्यासाठी 10 वेगवेगळ्या कंपन्यांनी मेळाव्यात सहभाग नोंदवून मुलाखती घेतल्या.
या मेळावा कालावधीत जिल्हातील वेगवेगळ्या भातील युवक व युवती दिलेल्या ठिकाणी मोठ्या संख्येने सकाळी 9 वाजता उपस्थित राहत होते. सहा दिवस चाललेल्या या मेळाव्यात तब्बल 1102 युवक आणि 118 युवती अश्या एकूण 1320 जणांनी मुलाखती दिल्या. यात पात्र उमेदवारांना लवकरच कंपनीकडून नियुक्तीपत्र देण्यात येईल.
सदर रोजगार मेळाव्यात आलेल्या सर्व उमेदवार तसेच उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची जेवणाची-पाण्याची व्यवस्था जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली होती. संपूर्ण मेळावा पोलीस अधिकारी श्री गणेश केंद्रे सो. वणी यांचे देखरेखेत संपन्न झाला. यावेळी पो. नि. वणी श्री गोपाल उंबरकर सो, पो. नि शिरपूर श्री माधव शिंदे सो. पो. नि. मारेगव श्री संजय सोळंके सो, पो. नि. मुकुटबन श्री दिलीप वडगावकर सो, पो. नि. पाटण श्री स्वप्निल ठाकरे सो. हे सर्व अधिकारी वर्ग आणि अमलदार उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!