Homeआरोग्यमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत 'निळकंठेश्वर पॅनल'ची बाजी! 21 पैकी 20 जागांवर...

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ‘निळकंठेश्वर पॅनल’ची बाजी! 21 पैकी 20 जागांवर विजय!

एकूण 21 जागांपैकी तब्बल 20 जागांवर विजय मिळवत ‘निळकंठेश्वर पॅनल’ने विरोधकांना पराभूत केलं आहे..

पोलीस वार्ता, पुणे : बारामतीच्या राजकारणात आणि सहकारी क्षेत्रात मोठा भूकंप घडवणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘निळकंठेश्वर पॅनल’ने दणदणीत विजय मिळवला असून बारामतीच्या राजकीय रंगभूमीवर वर्चस्व अधोरेखित केले आहे. एकूण 21 जागांपैकी तब्बल 20 जागांवर विजय मिळवत ‘निळकंठेश्वर पॅनल’ने विरोधकांना पराभूत केलं आहे.
या निवडणुकीत शरद पवारांच्या ‘बळीराजा सहकार पॅनल’ चा संपूर्ण पराभव झाला असून, भाजपचे चंद्रराव तावरे यांच्या ‘सहकार बचाव’ पॅनलला फक्त एकच जागा मिळवता आली आहे. स्वतः चंद्रराव तावरे हेच एकमेव विजयी उमेदवार ठरले.
अजित पवारांची ताकद अधोरेखित..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब वर्ग’ गटातून 101 पैकी 91 मते मिळवत मोठा बहुमत सिद्ध केला. ही निवडणूक केवळ साखर कारखान्याची नसून, ती पवार कुटुंबातील अंतर्गत सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू ठरली.
निवडणुकीत चार पॅनल रिंगणात होते..
1. निळकंठेश्वर पॅनल (अजित पवार)
2. बळीराजा सहकार पॅनल (शरद पवार गट)
3. सहकार बचाव शेतकरी पॅनल (चंद्रराव तावरे)
4. कष्टकरी शेतकरी समिती (अपक्ष)
प्रारंभापासूनच ‘निळकंठेश्वर पॅनल’ आघाडीवर राहिला आणि बहुतेक गटांत विजय मिळवला. फक्त सांगवी गटातून चंद्रराव तावरे विजयी झाले.

राजकीय अर्थ आणि भविष्याचा वेध..
1. सहकारी साम्राज्यावरील पकड: या विजयामुळे अजित पवारांनी बारामतीत सहकारी क्षेत्रावर आपली पकड अधिक बळकट केली आहे.
2. विरोधकांची आव्हाने: शरद पवार गटाला नव्याने रणनीती आखण्याची गरज निर्माण झाली आहे.
3. राजकीय परिणाम: ही निवडणूक आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर प्रभाव टाकू शकते.

रंजन तावरे यांचा आरोप..
“ही केवळ निवडणूक नव्हती, तर आर्थिक आणि प्रशासनिक यंत्रणेची जंत्री होती,” असा गंभीर आरोप रंजन तावरे यांनी केला. अजित पवार यांना माळेगावमध्ये आठ दिवस मुक्काम करावा लागला, असे सांगत त्यांनी सभासदांना पैशांचं आमिष दाखवल्याचा आरोप केला.
निष्कर्ष..
माळेगाव साखर कारखान्यावरचा गड आता स्पष्टपणे अजित पवारांच्या ताब्यात गेला आहे. ही निवडणूक केवळ सहकाराच्या चौकटीत बसत नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता निर्माण करते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : वर्षा चव्हाण, बारामती, संपर्क: 9763852891
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!