Homeआरोग्यमागासवर्गीय बेरोजगारांनी चारचाकी मालवाहतुक अनुदान योजनेसाठी 6 जूनपर्यंत अर्ज सादर करावेत

मागासवर्गीय बेरोजगारांनी चारचाकी मालवाहतुक अनुदान योजनेसाठी 6 जूनपर्यंत अर्ज सादर करावेत

जातीचा दाखला सक्षम प्राधिकाऱ्याचा असणे आवश्यक आहे. ग्रामसभेचा ठराव जोडणे आवश्यक राहील, वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 1 लाख 20 हजाराच्या आत असावे..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेस सन 2025-2026 या आर्थिक वर्षाकरीता 20 टक्के अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय बेरोजगारांना चारचाकी मालवाहतुक पुरविण्यासाठी अनुदान योजना घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 6 जून 2025 पर्यंत परिपुर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या शिफारसीसह संबंधित तालुका पंचायत समिती कार्यालयास सादर करण्याचे आवाहन नाशिक जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी दि.9 मे 2025 रोजी प्रसिध्द केलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

  • योजना लाभासाठी अटी व शर्ती?

या योजनेचा कालावधी दि. 31 मार्च, 2026 पर्यंत राहील, लाभार्थ्यास त्या तारखेच्या आत वाहन खरेदी करणे अनिर्वाय राहील. वाहन खरेदी बाबतचे अनुदान 2 लाख रुपये त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यामध्ये डीबीटीव्दारे हस्तांतरीत करण्यात येईल. लाभार्थी हा मागासवर्गीय म्हणजेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती व नवबौध्द या संवर्गाचा असावा. जातीचा दाखला सक्षम प्राधिकाऱ्याचा असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याच्या निवडीबाबत ग्रामसभेचा ठराव जोडणे आवश्यक राहील, लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 1 लाख 20 हजाराच्या आत असावे व सदर दाखला असून तो 31 मार्च, 2026 पर्यंत वैध असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याने यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसल्याबाबत स्वयंघोषणा अर्जासोबत जोडावे.
एका आर्थिक वर्षात एकच योजनेचा लाभ देण्यात येईल. लाभार्थ्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय व निमशासकीय सेवेत असल्यास त्याला योजनेचा लाभ घेता येणार नाही. याबाबत शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसल्याबाबत संबंधित ग्रामसेवकाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे व्यावसायिक वाहन चालविणेसाठी LMV-TR या गटातील CLASS OF VEHICLE-COV वाहन परवाना असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्याने खरेदी केलेल्या वाहनाचे इंजिन, वाहनाची इंजिन क्षमता किमान 500 सीसी वाहनाची अश्वशक्ती क्षमता किमान 1.8 HP ते 32.HP/किमान 500 kg. टॉर्क लोर्डिंग करीता चढाव वाहनाची ताकद क्षमता. 38 ते 75, NM/2000 RPM वस्तुचे मानांकन ISI असणे बंधनकारक राहील. वाहन खरेदी केल्यानंतर लाभार्थ्याने वाहनाचा फोटो, वाहनाचे आर.सी.बुक, वाहनाचा विमा, वाहनाचा टेस्ट रिपोर्ट, तपासणी अहवाल जोडणे आवश्यक राहील.
लाभार्थ्याला वरील तपशिलापेक्षा कमी तपशिलाचे वाहन खरेदी करता येणार नाही. लाभार्थ्याला वरील दिलेल्या तपशिलानुसार किंवा अधिक क्षमतेचे वाहन घेण्याची मुभा असेल, परंतु लाभार्थ्याला रूपये 2 लक्ष इतके अनुदान देय राहील. त्यापेक्षा अधिकचे अनुदान लाभार्थ्याला स्वतः भरावे लागेल तसेच रुपये 2 लक्ष अनुदान व्यतिरिक्त अधिकचा निधी लागल्यास लाभार्थ्यांना बँकेकडून फायनान्स करण्याची मुभा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने दिलेली आहे. लाभार्थ्याला वाहनाची प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करणे अनिर्वाय आहे. यासाठी लागणारा खर्च, परिवहन टॅक्स नोंदणी फी, इन्शुरन्स इत्यादी खर्च लाभार्थ्याला स्वतः करावा लागेल व त्यानंतर वाहन नोंदणीकृत झाल्यानंतरच अनुदान वितरीत करण्यात येईल. लाभार्थ्याने वाहनाची खरेदी करुन त्याचे देयके व वाहनाबरोबर फोटो काढून टेस्ट रिपोर्टसह जीएसटी, एसजीएसटीचे देयक ARAI प्रमाणपत्र समवेत सादर करणे आवश्यक राहील. प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभार्थ्याच्या राष्ट्रीयकृत बँकेला आधार संलग्न बँकखात्यात RTGS/ECS द्वारे अनुदान वर्ग करण्यात येईल तसेच लाभार्थ्याला सदरचे वाहन विक्री करता येणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!