Homeसामाजिकम्युनिसिपल हायस्कूल भुसावळ महापरिनिर्वाण दिन साजरा

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ महापरिनिर्वाण दिन साजरा

भुसावळ : येथील  म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे आज भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला त्या निमित्त प्रथम त्यांच्या प्रतिमेस डॉ प्रदिप साखरे , व शालिनी बनसोडे यांच्या हस्ते मल्यार्पण करण्यात आले. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस. जी मेढे, सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ठ शिक्षक डॉ.प्रदीप साखरे हे होते.

शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष मेढे यांनी अभिवादन सभेत बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. त्याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की जीवनात शिक्षणाचे किती महत्त्व आहे शिक्षणामुळे दगडाचा देव सुद्धा होऊ शकतो. घरची परिस्थिती अतिशय नाजूक असून सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी पोटाला तीडी चिमटा देऊन परदेशात जाऊन उच्च प्रतीच्या 34 पदव्या मिळवल्या त्यांना नऊ भाषेचे ज्ञान होते परदेशात शिक्षण घेतल्यानंतर आपल्या देशात येऊन समाजकार्य केले, राजकारण केले ते उत्कृष्ट संसद पटू होते. त्यांना हवे असते तर त्यांनी उच्च पगाराची नोकरी स्वीकारली असती परंतु आपल्या समाजासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारे नोकरी न करता ते समाजसेवा करत राहिले आणि आपल्या समाजासाठीच नव्हे तर अखंड भारत देशासाठी झटत राहिले. रात्रंदिवस अभ्यास करून त्यांनी आपल्या देशाला एक संविधान दिले घटना दिली जगातील सर्वश्रेष्ठ अशी घटना त्यांनी भारताला बहाल करून आपल्या देशाचे नाव जगामध्ये आजरामर केले . या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका श्रीमती संध्या धांडे, यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील बालपणीच्या आठवणी विद्यार्थ्याना सांगितल्या. लहानपणी त्यांना जातीयतेचे किती चटके सहन करावे लागले, किती यातना सहन कराव्या लागल्या, शाळेत अतिशय हुशार विद्यार्थी असून सुद्धा केवळ खालच्या जातीचे असल्यामुळे किती अवहेलना सहन कराव्या लागल्या, अपमान सहन करावा लागला तरीही न डगमगता या सगळ्या गोष्टीवर मात करून त्यांनी किती उच्च प्रकारचे शिक्षण घेतले याबद्दल माहिती सांगितली. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री एस टी चौधरीसर यांनी केवळ गरीब गरीब म्हणून चालत नाही तर माणसात जर जिद्द असेल तर तो प्राप्त परिस्थितीवर मात करून सुद्धा उच्च प्रतीचे शिक्षण घेऊ शकतो व समाजासाठी कार्य करू शकतो,आणि देशासाठी कार्य करू शकतो, बाबासाहेबांना शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागत होतो तरी सुद्धा ते न डगमगता निराश न होता त्यांनी शिक्षण घेतले व देशाला महान अशी घटना दिली, आपल्या देशातील प्रत्येक वंचित घटक हा कसा प्रगत होईल याच्यासाठी ते रात्रंदिवस झटत राहिले. स्त्रिया व दिन दुबळ्या घटकांसाठी ते कायम कार्य करीत राहिले शाळेच्या शिक्षिका श्रीमती रेखा सोनवणे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावरील दोन-तीन प्रसंग सांगितले व डॉ प्रदीप साखरे सर यांनी आपल्या सखोल अभ्यासाने बाबासाहेबांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना बाबासाहेबांचा आदर्श व अनुकरण करायला पाहिजे व शिक्षण घ्यायला पाहिजे. माणसात जर जिद्द असेल तर तो कुठेही पोहोचू शकतो जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये अभ्यासाची जिद्द होती अपार कष्ट करण्याची जिद्द होती तशी तुमच्यात सुद्धा अभ्यासाची जिद्द असेल तर तुम्ही सुद्धा कुठल्या कुठे पोहोचू शकाल असे ते याप्रसंगी म्हणाले. कोणत्या जातीत जन्माला आला यापेक्षा त्याने किती चांगले कार्य केले हे जीवनात महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांनी जे समाज कार्य केलं जे राजकारण केलं ते अतिशय प्रामाणिकपणाचा आणि कष्टाचे होते. त्यांच्या जीवनात कुठल्याच प्रकारे भ्रष्टाचाराचा कलंक नव्हता आणि म्हणूनच केवळ आपणच नव्हे तर संपूर्ण जग त्यांना मानत आहे. असे डॉ.प्रदिप साखरे म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री. एन एच राठोड सर यांनी केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!