Homeताज्या बातम्याभुसावळात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे कार्यकर्ता संमेलन उत्साहात

भुसावळात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे कार्यकर्ता संमेलन उत्साहात

शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती, अनेकांचा CRMS मध्ये प्रवेश

भुसावळ : सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (CRMS) आयोजित कार्यकर्ता संमेलन शनिवारी (दि.११) कृष्णचंद्र हॉल, भुसावळ येथे मोठ्या उत्साहात पार पडले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बाजपेई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अन्य संघटनांतील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सेंट्रल रेल्वे मजदूर संघात प्रवेश करून संघटनेवर विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी मुख्यालयातून जनरल सेक्रेटरी अनिल कुमार दुबे, कार्यकारी अध्यक्ष व्ही. के. सावंत, संयुक्त महामंत्री धर्मेश करदम तसेच मुंबई मंडल अध्यक्ष संजीव कुमार दुबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. प्रवीण बाजपेई यांच्या भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमनानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या मंडल कार्यालयापासून ढोल-ताशांच्या गजरात कृष्णचंद्र हॉलपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. हॉलमध्ये औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. प्रवीण बाजपेई यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्या, त्या सोडविण्यासाठी संघटनेचे सुरू असलेले प्रयत्न तसेच NFIR स्तरावर सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. संघटनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत NRMU मधील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच ECC सोसायटीचे डेलीगेट्स यांनी सेंट्रल रेल्वे मजदूर संघात प्रवेश केला. नव्याने प्रवेश केलेल्या सदस्यांनी संघटनेप्रती निष्ठा राखत CRMS ला अधिक बळकट करण्यासाठी तन, मन आणि धनाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाला भुसावळ मंडल सचिव एस. बी. पाटील, मंडल सचिव (कारखाना) किशोर कोलते, मंडल समन्वयक दीपक शर्मा, मंडल कोषाध्यक्ष एस. के. दुबे, मंडल कार्यकारी अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे, सहायक महामंत्री डी. के. पटसारिया, मंडल संघटक गणेश सिंह, मुख्यालय उपाध्यक्ष अलका चौधरी, मंडल महिला अध्यक्ष कल्पना भालेराव, मंडल महिला सचिव मंगला मोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!