Homeउद्योगपांडवलेणी येथील खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी व एक विधीसंघर्षितास नाशिक शहर गुन्हेशाखा...

पांडवलेणी येथील खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी व एक विधीसंघर्षितास नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 कडून अटक

नाशिक मधील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवलेणी भागात किरकोळ कारणावरून दि.13 एप्रिल रोजी एका तरुणाचा खून करण्यात आला..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरात दिवसाआड खून्हाच्या घटना घडताना दिसत आहे. यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे हे पोलीसांपुढे आव्हान बनले आहे. नाशिक मधील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवलेणी भागात किरकोळ कारणावरून दि.13 एप्रिल रोजी एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. यासंबंधी गुन्हा दाखल होताच. आरोपीला पकडून कारवाई करण्याबाबत नाशिक पोलीस आयुक्त मा.श्री संदीप कर्णिक साहेब यांनी आदेश दिले होते.
मिळालेली माहिती अशी की, इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवलेणी परिसरात ज्ञानपीठ सोसायटी समोर, दि.13 एप्रिल 2025 रोजी, रात्री 11.30 वाजेच्या सुमारास नेत्रदिप याचे 2 कबुतर विजय माळेकर याने काढुन ते शौकत याचे कबुतराच्या पेटीवर ठेवले या किरकोळ कारणावरून धारधार शस्त्राने रामा बोराडे याला शौकत शेख, नफीज सैय्यद, विजय माळेकर, प्रिन्स पालवे, रोहित पालवे, राहुल कुंभार व त्यांचे इतर साथीदार यांनी जिवे ठार मारले. या घटनेची फिर्याद साहिल राजन सिंग यांनी दिल्यावरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गु.र.नं 114/2025 भा.न्या.सं. कलम 103(1), 109(1), 189(4), 190, 191(3), 324(4), 49, 115(2), 351(2)/(3) 352 भा.ह.का. कलम 4/25 तसेच म.पो.का.कलम 135 प्रमाणे दि.14 एप्रिल रोजी 5.58 वाजता गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. आरोपींची माहिती घेत असतांना पोह. विशाल काठे व पोना. विशाल देवरे यांना गुप्त बातमी मिळाली की, गुन्ह्यातील संशयित शौकत शेख, नफीज सैय्यद व त्याचे साथीदार हे समर्थनगर, ज्ञानेश्वर नगर, पाथर्डीफाटा, नाशिक येथे येणार आहेत. ही माहीती मिळताच ती वपोनि श्री.मधुकर कड यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात सपोनि. हिरामण भोये, पोउनि. रविंद बागुल, पोह. विशाल काठे, प्रशांत मरकड, योगीराज गायकवाड, रविंद्र आढाव, नाझीमखान पठाण, पोना. विशाल देवरे, पोअं. अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, चालक श्रेणी पोउनि. किरण शिरसाठ यांचे पथक तयार करून पाथर्डी फाटा भागातील पाण्याच्या टाकीजवळ, समर्थ नगर, ज्ञानेश्वर नगर येथे संशयितांचा शोध घेतला असता ते मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांची नावे 1)नफीज रफीक सैय्यद, (वय-22) रा- साईड पार्क, ज्ञानेश्वर नगर, मेट्रो झोन, इंदिरानगर 2)शौकत फरीद शेख (वय-18) रा- सुमन हॉटेल शेजारील चाळ, फाळके स्मारक जवळ, पांडवलेणी 3) कार्तिक रंगनाथ भडांगे (वय-18) रा- दराडे किराणा दुकानाजवळ, सिंहस्थ नगर, सिडको व एक विधीसंघर्षित बालक असे आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त मा.श्री.संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त गुन्हे मा.श्री. प्रशांत बच्छाव, सहा. पोआ. गुन्हेशाखा मा.श्री.संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकाकडून करण्यात आली. या पथकात पोउनि. चेतन श्रीवंत आणि सुदाम सांगळे व संदीप भांड, प्रदीप म्हसदे, रोहिदास लिलके यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!