Homeआरोग्यन्यू रसोई हॉटेल आगीत पूर्ण भस्मसात सुदैवाने तळमजल्यावरील बँका थोडक्यात बचावल्या!

न्यू रसोई हॉटेल आगीत पूर्ण भस्मसात सुदैवाने तळमजल्यावरील बँका थोडक्यात बचावल्या!

आग इतकी भीषण होती की आग विझवण्यासाठी दोन अग्निशमन वाहने तैनात करण्यात आली होती, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे

पोलीस वार्ता, यवतमाळ : वाणीत महामार्गावर नांदेपेरा येथे असलेल्या साई मंदिरासमोर साई मंदिरासमोर एका व्यावसायिक कॉम्प्लेक्सला मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. या आगीत वरच्या मजल्यावर असलेले न्यू रसोई हॉटेल पूर्ण भस्मसात झाले असून सुदैवाने तळमजल्यावर इक्विटास बँक आणि स्टेट बँक थोडक्यात बचावल्या आहेत.
मिळालेली माहिती अशी की, नेहमीप्रमाणे बुधवारी 26 मार्च रोजी न्यू रसोई हॉटेल रात्री बंद करून सर्व कर्मचारी घरी गेले, मात्र मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास अचानक इमारतीतून धूर निघू लागला. मार्गावरून जात असताना रेस्टॉरंटमधून निघणारा धूर काही लोकांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ अग्निशमन दल आणि हॉटेल मालकाला याची माहिती दिली. आगीची माहिती मिळताच वणी अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण होऊन बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आगीच्या तीव्रतेमुळे इमारतीत मोठा आवाज होऊन काचा फुटल्या, पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आग इतकी भीषण होती की आग विझवण्यासाठी दोन अग्निशमन वाहने तैनात करण्यात आली होती.
अग्निशमन दलाचे अधिकारी नंदू बेलसरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक वाघमारे, आशुतोष जगताप, प्रीतेश गौतम, शुभम टेकाम आणि चालक देविदास जाधव या कर्मचाऱ्यांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत न्यू रसोई हॉटेल पूर्ण जळून खाक झाले होते. हॉटेलचे संपूर्ण साहित्य, कागदपत्रे, फर्निचर जळाले, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. इमारतीत हॉटेलच्या तळमजल्यावर इक्विटास बँक व बाजूलाच स्टेट बँक असल्याने ही आग आणखी पसरली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. सुदैवाने आग तळमजल्यावरील बँकांपर्यंत पोहोचली नाही. मात्र धुरामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. बँकेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी पाहणी करून घटनेची नोंद घेतली असून चौकशी करण्यात येणार आहे. प्रशासनाने यापुढे अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी स्थानिक व्यापारी व नागरिकांनी केली आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!