Homeआरोग्यनाशिकमध्ये 'जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहाचा' विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण उपक्रम!

नाशिकमध्ये ‘जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहाचा’ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण उपक्रम!

जे नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, पालक किंवा व्यावसायिक 100 किंवा या पेक्षा अधिक पुस्तकांचे संच उपक्रमासाठी उपलब्ध करून देतील, अशा सर्वांचा विशेष सत्कार करण्यात येईल..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिकमधील ‘जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह’ या संघटनेने यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. समूहाच्या माध्यमातून गरीब, गरजू आणि होतकरू इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्याचा हा उपक्रम असून यास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत सुमारे 500 विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली आहे.
या उपक्रमाची विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, हा समूह नाशिक मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः सुरू केला असून कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन हे विद्यार्थीच करत आहेत. दहावीच्या परीक्षा समाप्तीनंतर आयोजनाच्या हालचालींना वेग आला आहे.

समूहाचे प्रमुख प्रसाद भालेकर आणि अदित्य रिकामे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. उपक्रमात अमित पगार, ओम क्षिरसागर, ओमकार कुटे, अथर्व तुपे, सार्थक पवार, लायगुडे, मंथन शेरताटे आणि आर्यन इंगळे हे विद्यार्थी सक्रियपणे सहभागी आहेत.
अनेक विद्यार्थी हे खेड्यातील वस्तीत वास्तव्यास असून, त्यांच्या शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांसंदर्भात विचारणा करून विद्यार्थ्यांची नावनोंदणी करून घेतली आहे. यामुळे शिक्षकांच्या विद्यार्थ्यांविषयी असलेली आपुलकी व गुरूची शिष्यांबद्दल असलेली भावना दिसून आली.

जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह नाशिक तर्फे पाठ्यपुस्तके दान करणे संदर्भात सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. जे नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, पालक किंवा व्यावसायिक 100 किंवा या पेक्षा अधिक पुस्तकांचे संच उपक्रमासाठी उपलब्ध करून देतील, अशा सर्वांचा विशेष सत्कार करण्यात येईल. त्याचबरोबर त्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येईल. व्यावसायिकांच्या उत्पादनाचे किंवा प्रकल्पाचे प्रमोशन “प्रायोजक” (स्पॉन्सर) म्हणून करण्यात येईल. सामान्य नागरिक असतील तरीही त्यांना “प्रायोजक” म्हणून घोषित करण्यात येईल.
इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थीही ह्या उपक्रमात सहभागी होऊन पाठ्यपुस्तके दान करू शकतात. पाठ्यपुस्तके दान करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे समूहाने स्पष्ट केले आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवू पाहणाऱ्या या तरुण विद्यार्थ्यांचा हा उपक्रम नाशिक शहरातील समाजसेवेचे एक उत्तम उदाहरण ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांना सहकार्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे आवश्यक आहे.
पुस्तक दान करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी समूहाचे प्रमुख प्रसाद भालेकर यांच्याशी 9529195688 किंवा ईमेल आयडी jivankeshrimarathi@gmail.com वर सायं 4 ते 8 वाज्यच्या आत या वेळेत संपर्क साधावा.

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!