Homeसामाजिकधर्मांतर प्रकरणी कठोर कारवाईची मागणी; भाजपचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

धर्मांतर प्रकरणी कठोर कारवाईची मागणी; भाजपचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळ शहरात उघडकीस आलेल्या जबरदस्ती धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

भुसावळ नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे, गटनेते युवराज लोणारी, उत्तर विभाग शहराध्यक्ष संदीप सुरवाडे तसेच दक्षिण विभाग शहराध्यक्ष किरण कोलते यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

सदरील प्रकरण हे “लव्ह जिहाद”शी संबंधित असल्याचा आरोप करत प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच संबंधित मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्याला कडक शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तसेच आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींनाही सहआरोपी करण्यात यावे व भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार विनंते यांनी निवेदन स्वीकारले.

या प्रसंगी मनोज बियाणी, पुरुषोत्तम नारखेडे, महेंद्रसिंग ठाकूर, राजेंद्र आवटे, ॲड. बोधराज चौधरी, मुकेश पाटील, अजय नागराणी, सुजित भोळे, विशाल नाटकर, सतीश सपकाळे, रुपेश देशमुख, प्राची पाटील, श्रेयस इंगळे, कैलास पाटील, अल्बर्ट तायडे, उदय पाटील, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, जयंत माहूरकर, सागर चौधरी, शैलेजा पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्ष अनिता आंबेकर, भारती वैष्णव, माधुरी चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकल्प वाणी, कैलास शेलोडे, प्रा. प्रशांत पाटील, प्रशांत नेवे, गोपीसिंग राजपूत, गौरव लोणारी, पवन शिंदे, चेतन सावकारे, सुजित वानखेडे, प्रवीण कुटे, उमेश चौधरी, सागर साळी, जयप्रकाश शुक्ला, संजय विश्वकर्मा, धनराज वारके, आकाश राजपूत, विवेक इंगळे, खिलेश महाजन, तेजस झांबरे, आकाश वारके, हर्षल चौधरी, सचिन बऱ्हाटे, गणेश महाजन, रोहन वारुळकर, नकुल महाजन तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतकऱ्यांना खरीप हंगामात दर्जेदार खते, बियाणे, मिळण्यासाठी कृषी केंद्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी!

तपासणीत अनेक केंद्रांमध्ये नियमबाह्य व्यवहार, नोंदींमधील त्रुटी तसेच खत विक्रीसंदर्भातील अनियमितता आढळून आल्यामुळे कारवाई.. पोलीस वार्ता, नाशिक : शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये तसेच...

भुसावळात ओडीसा पोलिसांची धडक; खंडणी-खून प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
संशयिताला आश्रय प्रकरण अंगलट? माजी नगरसेवकांची जामनेरला धाव भुसावळ : शहर पोलीस स्टेशन हद्दीत ओडीसा राज्यातील खंडणी आणि खून प्रकरणातील संशयित आरोपी वास्तव्यास असल्याची गोपनीय...

मनमाड, देवळा, पेठ पोटनिवडणुकांच्या तयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी घेतला आढावा!

मनमाड नगरपरिषदेमधील 2 पदे, देवळा नगरपंचायतीतील 1 पद आणि पेठ नगरपंचायतीतील 1 पद अशा एकूण 4 रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका 20 जून रोजी.. पोलीस वार्ता, नाशिक...

विनाकारण कॉल करणाऱ्यास न्यायालयाने सुनावली शिक्षा

0
नंदुरबार, ता. २२ : डायल ११२ वर विनाकारण कॉल करून पोलिस यंत्रणेला त्रास दिल्याप्रकरणी एका व्यक्तीस न्यायालयाने ४०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी...

एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी पुन्हा मुदत वाढ अंतिम मुदत 30 जून 2026 पर्यंत..

1 जुलै 2026 पासून एच.एस.आर.पी. प्लेट नसलेल्या सर्व जुन्या-नव्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार.. पोलीस वार्ता, नाशिक : सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी...

error: Content is protected !!