गोपनीय माहिती मिळाली की, पाच ते आठ इसम आलिशान वाटर पार्कच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत अग्नी शस्त्र व इतर घातक हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत उभे आहे.
पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील आठवडे बाजार परिसरात गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी सायंकाळी गस्त करीत असतांना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पाच ते आठ इसम आलिशान वाटर पार्कच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत अग्नी शस्त्र व इतर घातक हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत उभे आहे. याबाबत पोलीस निरीक्षकांनी तात्काळ पथकास दालनात बोलावून मिळालेल्या माहितीची खात्री करून कारवाईचे आदेश दिले. पथकाने घटनास्थळी पोहचून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून शहानिशा केली असता सात संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली यात दोन गावठी बनावटीचे पिस्टल, चार काडतुस, पाच तलवार, चार चाकू व एक फायटर असे साहित्य मिळून आल्याने त्यांना अटक करून जेरबंद करण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, दरम्यान शहर बाजार पेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी महेश चौधरी, सोपान पाटील, राहुल वानखेडे, योगेश माळी, प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी यांनी रविवारी 8 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी सव्वा-आठ दरम्यान गस्त करत असतांना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गोपनीय बातमी मिळाली होती. संशयित आरोपी शेख इम्रान ऊर्फे मॉडेल, रसूल शेख (वय 21) रा.भरत नगर भुसावळ, अरबाज शेख शबीर (वय 30) रा.कोळंबे हॉस्पिटल समोर, दीनदयाल नगर, भुसावळ, शेख मुज्जमिल उर्फ मज्जू शेख हकीम (वय 30) तहानगर, इस्लामपुरा फैजपूर, शेख शोएब, शेख इकबाल खाटीक (वय 25) इस्लामपुरा मशीद जवळ, फैजपूर, आदित्य सिंह ऊर्फे विक्की अजय ठाकूर (वय 20) शिव मंदिर, अरण्य नगर इंदौर, राहुल ऊर्फे चिकू राम डेंडवाल (वय 18) जवाहर गंज, वार्ड नं-44 खंडवा, मध्यप्रदेश, मोहित जितेंद्र मेलावंश (वय 19) रामेश्वर पुलाजवळ खंडवा, असा एकूण 48,200 रु. किंमतीचा मुद्देमाल 2 गावठी बनावटीचे पिस्टल, चार काडतुस, पाच तलवार, चार चाकू व एक फायटर असे साहित्य त्यांच्या कब्जातून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी भूषण चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर बाजारपेठ पोलीस ठाण्यात रविवार 8 डिसेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन..
पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...
महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले..
पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण
बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण
दिनांक 18.04.2026...
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त”
बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट):
महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ
प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद
बुरहानपुर/18 अप्रैल,...