ठाणे ( प्रतिनिधी दिनेश पाटील ) कल्याणच्या चक्कीनाक्यावरील १3 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून करणाऱ्या विशाल गवळी आणि त्याची साथीदार पत्नी साक्षी गवळी यांना फाशीची सजा ठोठावण्याची मागणी सर्वच स्तरातून करण्यात येत आहे. आतातर वकील मंडळीही एकवटली आहेत.

घडलेल्या घटनेचा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील वकील संघटनांनी सोमवारी रोजी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. गस्ती पथकांची संख्या वाढवून गुन्हेगारी नियंत्रणात आणली पाहिजे, असे निवेदन वकील संघटनांच्या वतीने कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना देण्यात आले.
































