Homeताज्या बातम्याशहरात शनिवार व रविवार रोजी मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष SRI...

शहरात शनिवार व रविवार रोजी मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष SRI अर्ज शिबिरांचे आयोजन!

शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/BLO व पर्यवेक्षक दिवसभर मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदारांना मार्गदर्शन करतील..

पोलीस वार्ता, नाशिक | मतदान यादी पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील मतदारांचे अर्ज (Enumeration Form) भरण्याची प्रक्रिया ही दिनांक 17 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहणार असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी शहरातील 123- नाशिक पूर्व, 124 – नाशिक मध्य, 125 – नाशिक पश्चिम, 126 – देवळाली मतदारसंघांमध्ये 8 व 9 ऑगस्ट 2026 म्हणजे शनिवार व रविवार या कालावधीत सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.मधुमती सरदेसाई यांनी दिली आहे.
शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/BLO व पर्यवेक्षक दिवसभर आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदारांना मार्गदर्शन करतील. ऑनलाइन सुविधा वापरणे शक्य असलेल्या मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Fill Enumeration form या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर स्वतःचा मोबाईल नंबर किंवा एपिक क्रमांक आणि कॅप्चा टाकावा. त्यानंतर प्राप्त ओटीपी भरुन लॉगीन करावे. आपल्या राज्याचे नाव व EPIC कार्ड क्रमांक टाकून सर्च करावे आणि गणना पत्रक तपासून submit करावे. घरबसल्या Self Enumeration करून आपला Enumeration Form भरावा. तसेच कुटुंबातील तरुणांनी व तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या सदस्यांच्या इतर कुटुंबीयांनाही ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करावी.

ज्या मतदारांना Self Enumeration करणे शक्य नसेल त्यांनी आयोजित विशेष शिबिरादरम्यान मतदान केंद्रावर जाऊन बीएलओ यांच्या मदतीने Enumeration Form भरावा. मतदान केंद्रावर येताना शक्यतो मतदार ओळखपत्र (EPIC) तसेच आवश्यक माहिती व कागदपत्रे सोबत आणावीत. सन 2002 च्या मतदार यादीतील माहिती ECINET App द्वारेही शोधता येते.
अनेक मतदार दिवसभर घराबाहेर असल्याने, त्यांची घरे बंद अथवा बदललेले पत्ते यामुळे मतदान बीएलओ (BLO) यांना मतदारांपर्यंत पोहचता येत नसल्याने तसेच बीएलओ आपल्या घरी येण्याची वाट न पाहता शक्य असल्यास सेल्फ एन्युमरेशन (Self Enumeration) करावे किंवा विशेष शिबिरात सहभागी होऊन आपले अर्ज भरून द्यावे. संबंधित मतदान केंद्रावर बीएलओ उपस्थित नसल्यास हेल्प डेस्क क्रमांकावर 0253- 2310523 संपर्क साधावा. तसेच सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, Booth Level Agents (BLA), सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, युवक व स्वयंसेवी संस्थांनी मतदारांना सहकार्य करून SRI मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जन-विश्वास से जनकल्याण की नई राह, ग्रामीणों के बीच पहुंचा जिला प्रशासन

0
जम्बूपानी से जन-विश्वास अभियान का शुभारंभ अंतिम छोर के नागरिकों तक पहुंचेगी शासन की योजनाएं, हर शुक्रवार ग्रामीणों से सीधा संवाद जनप्रतिनिधियों एवं प्रशासनिक अधिकारियों ने...

प्रभारी मंत्री श्री सिलावट ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग से जिला प्रशासन के साथ की समीक्षा

0
मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान में ‘संवाद, समाधान, संवेदनशीलता और सादगी’ पर विशेष जोर हर घर तिरंगा एवं ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान में अधिकाधिक जनभागीदारी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर; खड्डे युक्त नाशिक आणि कुंभमेळ्याच्या कामावर...

नाशिकमध्ये विकासाच्या नावाखाली खोदकाम आणि खड्ड्यांचे जाळे तयार झाले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर.. पोलीस वार्ता, नाशिक | कुंभमेळा कामांसाठी झालेले...

लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी तरुणासह तिघांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ -  शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल तीन वर्षे शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ता.५ रोजी तरुणासह त्याच्या...

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उपवर्गीकरणाच्या विरोधात महसूल आयुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन!

अनुसूचित जाती उपवर्गीकरण आणि झोपडपट्टी रहिवाशांच्या सुरक्षितेसाठी महसूल आयुक्त मा.गेडाम साहेब यांना निवेदन.. पोलीस वार्ता, नाशिक | पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर अनुसूचित...

error: Content is protected !!