Homeताज्या बातम्यापीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उपवर्गीकरणाच्या विरोधात महसूल आयुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन!

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उपवर्गीकरणाच्या विरोधात महसूल आयुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन!

अनुसूचित जाती उपवर्गीकरण आणि झोपडपट्टी रहिवाशांच्या सुरक्षितेसाठी महसूल आयुक्त मा.गेडाम साहेब यांना निवेदन..

पोलीस वार्ता, नाशिक | पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर अनुसूचित जाती (SC) उपवर्गीकरणाच्या विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले. नाशिकरोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या आदेशाने धरणे आंदोलन व सरकारच्या उपवर्गीकरण निर्णया विरोधात निदर्शने करण्यात आले. यावेळी मोर्चाचे नेतृत्व ॲड.शशीभाई उन्हवणे यांनी केले.

यावेळी सरकारच्या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या व दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या धोरणाविरुद्ध मोर्चेकरांनी घोषणा देत सरकारचा निषेध केला. तसेच शहरातील नाशिकरोड भागात असणाऱ्या चव्हाण मळा झोपडपट्टीतील रहिवाशांच्या बेघर करण्याचा व त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न वरील या दोन मुद्द्यांवर विभागीय महसूल आयुक्त मा.गेडाम साहेब यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात चव्हाण मळा झोपडपट्टी परिसरातील नागरिक गेल्या 40 ते 50 वर्षांपासून तेथे वास्तव्यास असून काही बांधकाम व्यावसायिकांकडून गावगुंड पाठवून रहिवाशांवर दबाव टाकला जात असून त्यांना जागा खाली करण्यास धमकावले जात आहे. या प्रकारामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, रहिवाशांना संरक्षण द्यावे आणि जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू ठेवाव्यात, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी मोर्चात रिपब्लिकन नेते मनोज गांगुर्डे, मुरली घोरपडे, देविदास डोखे, नितीन पगारे,रवी खरात, इम्रान शेख, सिद्धार्थ भालेराव, राज निकाळे तसेच शकील शेख, जावेद शेख, पप्पू जाधव, भारत विणकर, आप्पा पगारे, प्रदीप वीर, प्रवीण पगारे, प्रवीण जाधव, मीना पगारे, मुक्ता खर्जुल, पंचफुला गायकवाड, अलका निकम, आदी महिला पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!