Homeताज्या बातम्यामनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर; खड्डे युक्त नाशिक आणि...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर; खड्डे युक्त नाशिक आणि कुंभमेळ्याच्या कामावर लक्ष?

नाशिकमध्ये विकासाच्या नावाखाली खोदकाम आणि खड्ड्यांचे जाळे तयार झाले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर..

पोलीस वार्ता, नाशिक | कुंभमेळा कामांसाठी झालेले खोदकाम आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शहरात आतापर्यंत पाच जणांना प्राण गमवावे असून अपघाताचे सत्र सुरूच आहे. अपघाटनमध्ये अनेक जण जखमी देखील झाले आहेत. नाशिकमध्ये विकासाच्या नावाखाली खोदकाम आणि खड्ड्यांचे जाळे तयार झाले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या बैठकांसाठी गुरूवारपासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले आहेत.

गेल्या महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे हे प्रथमच नाशिकमध्ये दौऱ्यावर आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाशी युती करून मनसेने महापालिका निवडणूक लढविली होती. परंतु, त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. सर्व जागांवर मनसे पराभूत झाली. निवडणुकीतील पराभवाची कारणमिंमासा, कुंभमेळा कामांमुळे नाशिकमध्ये निर्माण झालेली स्थिती याचा आढावा राज ठाकरे यांच्याकडून घेण्यात आला. गुरुवारी दि.6 ऑगस्ट रोजी सकाळी मुंबई नाका येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आले असता त्यांचे स्वागत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून केले गेले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात शाखा अध्यक्षांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर नाशिक ग्रामीण म्हणजे 15 तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. महापालिका निवडणुकीतील उमेदवार आणि मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांच्यासमवेत राज ठाकरेंनी चर्चा केली. दुपारी शहर कार्यकारिणी आणि इतर अंगीकृत संघटना यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली. शुक्रवारी दि.7 ऑगस्ट रोजी मनसेमध्ये इतर पक्षांमधील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

2025 मधील कुंभमेळ्यात नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता होती. त्यावेळी अनेक कामे होऊनही यंदासारखी बिकट परिस्थिती उद्भवली नव्हती. यावेळी धोकादायक स्थिती असून खोदकामांनी शहरातील एकंदर स्थितीचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून अवलोकन केले जाण्याची शक्यता आहे. साधुग्राम उभारणीसाठी सुमारे दोन हजार झाडे तोडण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवल्यानंतर मनसेने त्यास विरोध केला. मागील कुंभमेळ्यात तपोवनातील एकही झाड तोडावे लागले नव्हते. यावेळी इतकी झाडे तोडण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न मनसेकडून उपस्थित होत आहे. राज ठाकरे हे मनसेच्या महापालिकेतील सत्ताकाळात कुंभमेळ्यातील कामे आणि भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या सत्ता काळातील कुंभच्या कामांची तुलनात्नक मांडणी करण्याची शक्यता पक्षाच्या गोटातून वर्तविली जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!