Homeताज्या बातम्याअवकाळी पावसात पिकांचे मोठे नुकसान ; सरसकट नुकसान भरपाई व कर्जमाफीची मागणी

अवकाळी पावसात पिकांचे मोठे नुकसान ; सरसकट नुकसान भरपाई व कर्जमाफीची मागणी

शिंदी परिसरातील शेतकऱ्यांची आर्त मागणी 

भुसावळ –  अवकाळी पावसाने शिंदी व परिसरातील कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांची माती झालेली आहे. कापूस, मका आणि सोयाबीन या प्रमुख खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई तसेच संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी,अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.निलिमा गिरीश नेमाडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अवकाळी पावसाने उध्वस्त केली शेतकऱ्यांची मेहनत –
खरीप हंगामाच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे.अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली होती,मात्र सततच्या पावसामुळे लावलेला खर्चही परत न मिळण्याची वेळ आली आहे.कापूस,मका आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले असून,काही ठिकाणी कापसाच्या झाडांवर बोंड काळवंडले,तर काही ठिकाणी मक्याच्या कणसांना कोंब फुटले आहेत.

पंचनाम्यांतील त्रुटी आणि वंचित शेतकरी –

प्रशासनाने काही ठिकाणी सोयाबीन व मका पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर केली असली तरी अनेक शेतकरी पंचनाम्यांअभावी मदतीपासून वंचित राहिले आहेत.नुकसान सर्वत्र झाले असताना काही शेतकऱ्यांनाच मदत मिळणे हा अन्याय असल्याची भावना शेतकरीवर्गात आहे. त्यामुळे नुकसानभरपाई देताना कोणताही भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सततच्या पावसामुळे वाढलेले नुकसान –

गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.कापसावर लाल्या रोगाचे आक्रमण सुरू झाले असून,फुलपाती व कैऱ्या गळून पडल्या आहेत.मका व सोयाबीन शेतातच कुजत आहे,तर मक्याचे ढीग भिजून जनावरांच्या चार्‍याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातचा गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांची मागणी — “पंचनामे नाही, तर सरसकट मदत द्या !

शिंदी,मोंढाळ,विचवा,मानमोडी,विल्हाळा या कोरडवाहू भागांतील परिस्थिती पाहता,केवळ पंचनामे हा निकष न ठेवता हेक्‍टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई आणि संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.या मागणीसाठी सौ.निलिमा गिरीश नेमाडे,माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप कोल्हे, अर्जुन धांडे,भूषण राजपूत,रवींद्र लोहार, अनिल कोल्हे,ऋषिकेश महाजन व माजी उपसरपंच भीमराव तायडे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

“पिकांचे झालेले नुकसान हे सर्वांचेच आहे. पंचनाम्यांच्या अडचणींमुळे कोणीही मदतीपासून वंचित राहू नये. शासनाने सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी,
सौ.निलिमा नेमाडे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!