Homeताज्या बातम्याभुसावळ पोलिस ठाण्यात एडीजीपी नवल बजाज यांची तपासणी; सट्टा-मटका प्रकरणात गोंधळ

भुसावळ पोलिस ठाण्यात एडीजीपी नवल बजाज यांची तपासणी; सट्टा-मटका प्रकरणात गोंधळ

भुसावळ – राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (एडीजीपी) नवल बजाज यांनी आज भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे तीन तास सखोल तपासणी केली. त्यांच्या सोबत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधून भुसावळ ठाण्याची निवड तपासणीसाठी करण्यात आली होती. एडीजीपी बजाज यांनी रेकॉर्ड, गुन्हे, चौकश्या आणि कामकाजाचा सखोल आढावा घेतला. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनाही तपासणी दरम्यान महत्वाच्या सूचना देण्यात आल्या.

तपासणी दरम्यान एक विनोदी प्रसंगही घडला—वरिष्ठ अधिकाऱ्यांना शौचालयास जाण्याची वेळ आली असता कुलुपाची चाबी उपलब्ध नव्हती आणि शेवटी पोलीस कर्मचाऱ्यांना कुलुप तोडावे लागले. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, चाबी पोलिस निरीक्षकांच्या कार्यालयात होती, परंतु एडीजीपीच्या उपस्थितीत ती मिळू शकली नाही.

एडीजीपी बजाज यांनी पत्रकारांशी संवादात म्हटले की, “जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे, परंतु पोलिसांची संख्या त्यानुसार वाढलेली नाही. भरतीसाठी सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.”

तपासणी दरम्यान पत्रकारांना बाहेर राहण्यास सांगण्यात आले, ज्यामुळे थोडा वाद निर्माण झाला.

तपासणी दरम्यान हर्षल सावकारे आणि मयुर सावकारे या दोन्ही बंधूंनी एडीजीपींच्या उपस्थितीत थेट पोलिस प्रशासनाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स” परिसरातील सट्टा-मटका आणि जुगारधंद्यांविरोधात तक्रार केली. सावकारे बंधूंनी म्हटले की, “बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अवैध धंदे सुरू आहेत आणि त्यातून लाखो रुपये कमावले जात आहेत. पोलिस आणि नगरपालिकेच्या संगनमताने हे व्यवसाय सुरू आहेत.”

सावकारे बंधूंच्या आंदोलनानंतर सट्टा-मटका दुकानदारांनी घाईघाईने दुकाने बंद करून पळ काढला. या घटनेमुळे पोलिस प्रशासन आणि नगरपरिषदेची प्रतिमा धोक्यात आली असून आता या प्रकरणात पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!