भुसावळ – शहरातील विठ्ठल मंदिर वार्डातील प्राचीन श्री बड़ा हनुमान मंदिरा तर्फे सामुहिक हनुमान चालिसा पठण या उपक्रमाची सुरुवात दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती या उपक्रमाला १०१ आठवडे पूर्ण होत असून त्या निमित्ताने श्री बड़ा हनुमान मंदिरा तर्फे दिनांक २७ डिसेंबर शनिवारी सायंकाळी ठीक ७:०० वाजता विशेष सामूहिक हनुमान चालिसा पठण व महा आरती आयोजित करण्यात आली आहे
जात-पात विसरून सकल हिंदू समाजाचे संघटन करणे हिंदू धर्माचे व आपल्या संस्कृतीचे संरक्षण करणे, देश अखंड रहावा व संपूर्ण विश्वाचे कल्याण व्हावे या प्रमुख उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भुसावळमधील तसेच परिसरातील नागरिकांनी या सामूहिक हनुमान चालिसा पठणाला उपस्थिती द्यावी असे आवाहन श्री बड़ा हनुमान मंदिर व भक्त परिवारा तर्फे करण्यात येत आहे.




































