आमदार महेश सावंत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉक्टरांच्या सल्ल्याने महेश सावंत लिलावती रुग्णालयात विश्रांती घेत आहेत..

पोलीस वार्ता, मुंबई: माहिमचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत, ज्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एक महत्त्वपूर्ण विजय मिळवला आणि माजी आमदार सदा सरवमकर व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुत्र अमित ठाकरे यांचा माहिम विधानसभेत पराभव केला, हे आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. निवडणुकीच्या कामाच्या ताणामुळे त्यांना शारीरिक त्रास होऊ लागला आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. महेश सावंत यांच्यावर अँजिओप्लास्टी केली गेली आहे.

सध्या ते रुग्णालयात विश्रांती घेत आहेत आणि डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवले जात आहे. डॉक्टरांच्या अपेक्षेनुसार, दोन ते तीन दिवसांत त्यांची स्थिती सुधारली, तर त्यांना घरी पाठविण्याचा निर्णय घेतला जाईल.

माहीम विधानसभा निवडणूक निकाल!
-
महेश सावंत- शिवसेना(उबाठा) : 50 हजार 213 मते मिळाली, -1316 मतांनी विजय!
-
सदा सरवणकर, शिवसेना(शिंदे गट) : 48 हजार 897 मते, -1316 मतांनी पराभव.
-
अमित राज ठाकरे, मनसे : 33 हजार 062 मते, -17 हजार 151 मतांनी पराभव.



































