Homeउद्योगवणीमध्ये भीम टायगर सेनेचा 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा!

वणीमध्ये भीम टायगर सेनेचा 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा!

कार्यक्रमात मोठ्या संख्येने अनुयायांनी सहभाग घ्यावा असे सांगण्यात आले आहे. धम्मभोजनाचे आयोजन, भीम जयंती रथ-रॅलींचे स्वागत आणि सत्कार करण्यात येणार..

पोलीस वार्ता, यवतमाळ : 2025 यावर्षी वणीत भीम टायगर सेनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ऐतिहासिक आणि अभूतपूर्व सोहळ्याने साजरी करण्याचे आयोजन केले आहे.
हा केवळ एक कार्यक्रम नसून डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची विजययात्रा असणार आहे. वणीतील रस्ते जयभीमच्या घोषणांनी दणदणार आणि इतिहास घडणार! असा दावा भीम टायगर सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. आदल्या रात्री 13 एप्रिलच्या रात्री 12 वाजता केक कापून महामानवाला मानवंदना अर्पण केली जाईल. हा क्षण प्रत्येक भीमसैनिकांसाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक असतो. 14 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेपासून कार्यक्रमांना सुरुवात होईल व त्याच वेळी धम्मभोजनाचे आयोजन करण्यात येईल, यासाठी कार्यक्रमात मोठ्या संख्येने अनुयायांनी सहभाग घ्यावा असे सांगण्यात आले आहे.
महामानव डॉ.बाबासाहेबांनी शिकवलेल्या समता आणि बंधुभावाच्या तत्वांनुसार कोणताही जातीभेद, प्रांतभेद न करता आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येऊन या महान विभूतीचा जन्मोत्सव, जयंती उत्सव साजरा करणार आहोत.

14 एप्रिल सायं 6.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे येणाऱ्या सर्व भीम जयंती रथ-रॅलींचे स्वागत आणि सत्कार करण्यात येणार आहे. शहरात जयंतीदिनी भीमअनुयायांचा महासागर उसळणार आहे, जयंतीच्या घोषणा आणि महामानवाच्या जयजयकाराने परिसर धम्ममय होणार आहे. हा जयंती सोहळा दिमाखात साजरा करण्याचे सर्व नियोजन भीम टायगर सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष योगेश रायपुरे, जिल्हा संघटक आनंदकुमार शेंडे आणि तालुकाध्यक्ष राज घायवन यांनी केली आहे. वणी करांना हा सोहळा व क्षण नेहमी आठवणीत राहील असे आयोजन करण्याचे योजिले आहे.
हा उत्सव कार्यक्रम म्हणजे फक्त जयंती सोहळा नसून डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची भीमगर्जना असेल, या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आणि आपल्या देशाच्या महान व्यक्तित्वाला, महामानवाला अभिवादन करण्यासाठी सर्वांनी 14 एप्रिल रात्री उपस्थित राहावे. ही हाक भीम टायगर सेनेच्या वतीने नागरीकांना देण्यात आली आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!