Homeताज्या बातम्या१५ लाखांचे १०९ गहाळ मोबाईल नागरिकांना परत ; भुसावळात पोलीस अधिकारी-अंमलदारांना हेल्मेट...

१५ लाखांचे १०९ गहाळ मोबाईल नागरिकांना परत ; भुसावळात पोलीस अधिकारी-अंमलदारांना हेल्मेट वाटप

भुसावळ : जळगाव जिल्हा पोलीस दलाने हरविलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत देत नागरिकांचा विश्वास संपादन करणारी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बुधवारी आयोजित विशेष कार्यक्रमात तब्बल १५ लाख १९ हजार ४९८ रुपये किंमतीचे १०९ मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. याचवेळी पोलीस अधिकारी-अंमलदार व पत्रकारांना हेल्मेटचेही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या हस्ते मोबाईल परत करण्यात आले. भुसावळ उपविभागातील शहर, बाजारपेठ, तालुका व नशिराबाद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ६८ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले असून त्यांची किंमत सुमारे ९ लाख ४४ हजार ४९८ रुपये आहे. तर मुक्ताईनगर उपविभागातील मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव व सावदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ४१ मोबाईल, अंदाजे ५ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले.
कार्यक्रमात नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले. भुसावळ उपविभागातील ४५ पोलीस अंमलदार तसेच पाच पत्रकारांना विविध दुचाकी शोरूमच्या सहकार्याने हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यामध्ये बजाजचे योगेश चंदन, पंकज टीव्हीएसचे दंपेश फेगडे, होंडाचे दिपक पांडे, सुझुकीचे सुहास बि-हाडे व रॉयल एनफिल्डचे शुभम परदेशी यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या दालनाचे उद्घाटनही पोलीस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, राहुल वाघ, महेश गायकवाड यांच्यासह भुसावळ उपविभागातील अधिकारी, सुमारे ५० पोलीस अंमलदार, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाजनको रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला त्रास? ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी;अश्लील मेसेज पाठवल्याचाही आरोप

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र (महाजनको) रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापकांकडून मानसिक त्रास देत ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी...

अन्न व औषध प्रशासनाच्या मोहीमेत 1 लाख 19 हजार रुपये किंमतीचा अन्नपदार्थ साठा जप्त!

अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक : अन्न व औषध प्रशानाकडून नागरिकांना...

जळगाव एसीबीची भुसावळात धडक कारवाई

0
बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह खासगी पंटराविरोधात लाचखोरीचा गुन्हा भुसावळ - शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे आणि त्यांचा खासगी पंटर सलीम हाकीम कुरेशी यांच्याविरुद्ध...

पोलीस आयुक्तांकडून शहरात 12 जून मध्यरात्री पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी!

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये होणार कारवाई.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक...

महाजनको रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याची ‘वसुली’ थांबवताच पदावनती?

0
कोरोना योद्धा सिस्टरला वरिष्ठांचा मानसिक छळ; वैद्यकीय अधिकारी व व्यवस्थापकांवर गंभीर आरोप भुसावळ (निलेश.के.फिरके)  तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र (महाजनको) रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला सिस्टरला...

error: Content is protected !!