Homeताज्या बातम्यास्वा.सावरकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात व जल्लोषात भगूरमध्ये साजरी!

स्वा.सावरकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात व जल्लोषात भगूरमध्ये साजरी!

भगूर शहरामध्ये जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन, यात असंख्य नागरिक, युवक, महिला व विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते..

पोलीस वार्ता, देवळाली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज दि.28 मे रोजी भगूर या त्यांच्या जन्मभूमी नगरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7:00 वाजता भगूर नगरपरिषद नगराध्यक्षा सौ.प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या हस्ते तसेच भगूरचे नगरसेवक, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत स्वा.सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

भगूर शहरामध्ये जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेमध्ये असंख्य नागरिक, युवक, महिला व विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. हातात भगवे ध्वज, देशभक्तीपर घोषणा आणि ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या शोभायात्रेने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
स्वा. सावरकरांचे भगूर हे जन्मगाव असल्याने दिवसभर येथे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, अभ्यासक व सावरकर प्रेमींनी मोठ्या संख्येने भेट दिली. सावरकर वाड्यास भेट देत अनेकांनी आपल्या कला, देशभक्तीपर गीते, पोवाडे, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. त्यामुळे संपूर्ण भगूर नगरी देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेली होती.

भगूर नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद कार्यालय तसेच सावरकर वाडा येथे पुष्पहार अर्पण करून स्वा.सावरकरांना अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्षा व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सावरकरांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. अशा विविध उपक्रमांद्वारे भगूर नगरीत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती मोठ्या उत्साहात, अभिमानाने आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

error: Content is protected !!