Homeक्राईमपुण्याच्या हॉटेल व्यावसायिकाला फलटणमध्ये 'हनी ट्रॅप' !

पुण्याच्या हॉटेल व्यावसायिकाला फलटणमध्ये ‘हनी ट्रॅप’ !

पुण्याच्या हॉटेल व्यावसायिकाला फलटणमध्ये ‘हनी ट्रॅप’ ! गोड बोलून फ्लॅटवर बोलावले, ‘रेप’ची धमकी देत लुटले तब्बल ३२ लाख; पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आवळल्या मुसक्या !

(संतोष मोहिते भोर ) सविस्तर माहितीच्या नुसार पुण्याच्या एका हॉटेल व्यावसायिकाला व्हॉट्सअॅपवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढून फलटणमध्ये हनी ट्रॅप केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल ३२ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या सराईत टोळीला फलटण शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करत धडक कारवाई केली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १४ फेब्रुवारी : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरून अनोळखी व्यक्तींच्या प्रेमात पडणे किती महागात पडू शकते, याचा एक थरारक आणि डोळे उघडणारा प्रकार फलटणमध्ये उघडकीस आला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील एका हॉटेल व्यावसायिकाला ‘हनी ट्रॅप’मध्ये ओढून बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल ३२ लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. मात्र, या घटनेची माहिती मिळताच फलटण शहर पोलिसांनी ‘सिंघम’ स्टाईलने सूत्रे हलवत अवघ्या दोन तासांत या गुन्ह्यातील पाच सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

असा रंगला ‘हनी ट्रॅप’चा खेळ…

या थरारक घटनेची सुरुवात ११ फेब्रुवारी रोजी झाली. एका महिलेने संबंधित हॉटेल व्यावसायिकाला व्हॉट्सअॅपवर कॉल करून आपल्या गोड आणि अश्लील बोलण्याच्या जाळ्यात ओढले. या प्रेमाच्या भूलथापांना बळी पडून १३ फेब्रुवारी रोजी दुपारी हा व्यावसायिक फलटणमधील बुधवार पेठ परिसरातील एका फ्लॅटवर आला. तिथे पोहोचल्यावर या प्रेमाच्या नाटकाचा भयंकर चेहरा समोर आला. संबंधित महिला आणि तिच्या इतर साथीदारांनी मिळून (एकूण ८ जण) एक भयानक कट रचला होता.फ्लॅटवर येताच या टोळीने व्यावसायिकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. “तुला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवतो,” अशी गंभीर धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल ४० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. जीव वाचवण्यासाठी घाबरलेल्या व्यावसायिकाकडून या टोळीने रोख रक्कम, एटीएम आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून १ लाख ९५ हजार रुपये जबरदस्तीने उकळले.
…आणि रस्त्यात लुटले ३० लाखांचे सोने!
पैसे उकळल्यानंतर या टोळीचा क्रूर खेळ थांबला नाही. व्यावसायिकाला फलटणमधून पुणे रस्त्याला सोडण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून नेण्यात आले. वाटेत दोन अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवली आणि पुन्हा मारहाण करत व्यावसायिकाच्या गळ्यातील तब्बल २० तोळे वजनाची (सुमारे ३० लाख रुपये किमतीची) सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली.

पोलिसांची धडक कारवाई; दोन तासांतच आरोपींना गजाआड केले.या भयंकर लुटमारीनंतर हादरलेल्या व्यावसायिकाने तात्काळ फलटण शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

पोलिसांनी विविध पथके तयार करून अवघ्या दोन तासांत फलटण शहर व परिसरातील दत्तनगर, सस्तेवाडी, मंगळवार पेठ आणि ठाकूरकी येथील ५ सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या. खाक्या दाखवताच या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत. या घटनेमुळे अनोळखी व्यक्तींच्या भुलथापांना बळी पडू नये, असा स्पष्ट इशारा पोलिस विभागा तर्फे देण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माध्यमांनी महिलांविषयी वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी!

महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या ‘इनडिसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ वूमन’ कायद्याचे वारंवार उल्लंघन.. पोलीस वार्ता, मुंबई : वृत्त माध्यमांनी महिलांविषयीचे वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी,...

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

परभणीत बसवेश्वर, एकोरामाराध्य व परशुराम जयंती उत्साहात साजरी

0
परभणी : शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, जगदगुरू एकोरामाराध्य आणि भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील उघडा महादेव मंदिर,...

ट्रेचिंग ग्राउंड निरीक्षण, स्वच्छ सर्वेक्षण में नंबर-1 का लक्ष्य

0
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 की तैयारियों को लेकर नगर परिषद शाहपुर ने कमर कस ली है। इसी क्रम में अध्यक्ष प्रतिनिधि श्री वीरेंद्र तिवारी ने...

जनगणना 2027: शाहपुर में डिजिटल स्व-जनगणना को बढ़ावा

0
शाहपुर | दिनांक 20 अप्रैल 2026 नगर परिषद शाहपुर की अध्यक्ष श्रीमती साधना वीरेंद्र तिवारी द्वारा जनगणना 2027 के अंतर्गत स्व-जनगणना (Self Enumeration) प्रक्रिया को...

error: Content is protected !!