Homeसामाजिकवाईत २१ ते २५ मे दरम्यान लघु कुंभमेळा चे आयोजन

वाईत २१ ते २५ मे दरम्यान लघु कुंभमेळा चे आयोजन

वाई – मध्य प्रदेश हेड रमाकांत मोरे: वाई शहरात प्रथमच भव्य स्वरूपात लघु कुंभमेळा २०२६’चे आयोजन करण्यात आले असून, २१ ते २५ मेदरम्यान महागणपती घाट येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. वाई नगरपरिषद आणि लघु कुंभसेवा समिती, शक्ती शिवगंगा अटल आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कुंभमेळ्यात देशभरातील सुमारे ३५० साधू-संत, नागा संन्यासी, महामंडलेश्वर आणि विविध आखाड्यांचे संत सहभागी होणार आहेत. हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यांप्रमाणेच वाईचे धार्मिक महत्त्व जगासमोर यावे, हा या आयोजनामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. सोहळ्या दरम्यान २१ मे रोजी भुमिपुजन व छावणी प्रवेश, २२ मे रोजी धर्मध्वजा आरोहण, २३ मे रोजी विष्णूयाग व सार्वजनिक हवन, २४ मे रोजी हिंदू महासभा व दीप प्रज्वलन, तर २५ मे रोजी नागा संन्यासींचे पावन स्नान, रथ शोभायात्रा आणि महिला कलश शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या कुंभमेळ्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरीजी महाराज यांच्यासह विविध पीठाधीश्वर उपस्थित राहणार आहेत. तसेच मंत्री, खासदार, आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरही सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या दरम्यान, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीत पुरेसे पाणी सोडण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!