Homeक्राईमलकीबा नगरात अनोळखी तरुणाचा संशयास्पद मृत्यू; घातपाताचा संशय,पोलिसांचा तपास सुरू

लकीबा नगरात अनोळखी तरुणाचा संशयास्पद मृत्यू; घातपाताचा संशय,पोलिसांचा तपास सुरू

भुसावळ : शहरातील लकीबा नगर परिसरात गुरुवारी (ता. ११) एका अनोळखी तरुणाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत घातपाताची शक्यता व्यक्त होत असून बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचा मृतदेह हिरव्या रंगाच्या ओढणीच्या सहाय्याने झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी मृतदेह आढळला त्या झाडापर्यंत पोहोचण्यासाठी जवळच असलेल्या गेल्या २० ते २५ वर्षांपासून बंद पडलेल्या घराच्या छतावरून जावे लागते. त्यामुळे मृतदेह झाडाला लटकविण्यात आला असावा, अशी शक्यता नाकारता येत नसल्याने प्रकरण अधिक गूढ बनले आहे.

सदर घराचे मालक श्रीकांत पाठक असून ते सध्या पुणे येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्या की घातपात, याबाबत विविध शक्यता तपासल्या जात असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

या संशयास्पद घटनेमुळे लकीबा नगर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती व चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून मृत तरुणाची ओळख पटविण्याचे प्रयत्नही वेगाने सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

error: Content is protected !!