Homeक्राईमघरफोडीचा छडा; दोन आरोपी जेरबंद, 2.49 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत!

घरफोडीचा छडा; दोन आरोपी जेरबंद, 2.49 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत!

घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून १ लाख ४६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले..

पोलीस वार्ता, भुसावळ, : पंचशील नगर परिसरातील घरफोडी प्रकरणाचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून एकूण २ लाख ४९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचशील नगर येथील रहिवासी शुभम विनायक जामनकर (वय ३२) हे १८ मे ते ७ जून २०२६ दरम्यान बाहेरगावी गेले होते. या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून १ लाख ४६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(१), (३) व (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सैय्याद तोहीद सैय्यद मनियार (वय २१) व अरबाज शेख अजमल शेख (वय २६, दोघेही रा. पंचशील नगर, भुसावळ) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी सदर घरफोडीची कबुली दिली. तसेच आणखी एका घरफोडीची कबुली देत साक्षीदाराच्या घरातून ७ ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख ३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचेही उघड झाले.
पोलिसांनी आरोपींकडून एकूण २ लाख ४९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतिलाल केदारे तसेच योगेश माळी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, जीवन कापडे, जावेद शाह, अमर अढाळे, दिलीप कोल्हे, अक्षय कोतकर आणि चंद्रकांत रायपुरकर यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतिलाल रघुनाथ केदारे करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

error: Content is protected !!