शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा जपत समाजकार्य करत असताना शशीभाईंनी असंख्य गोरगरिबांना मदत केली आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : सर्व जाती धर्माच्या गोरगरीब, पीडित, शोषित जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लोकशाहीच्या मार्गाने त्यांना न्याय मिळवून देणारे आंबेडकरी चळवळीचे महाराष्ट्राचे नेते व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष आणि समाजसेवेसाठी अनेक सामाजिक पुरस्काराने सन्मानित असे समाजसेवक ॲड.शशिभाई उन्हवणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा! दि.22 जुलै 2025 रोजी कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा झाला!

शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा जपत समाजकार्य करत असताना शशीभाईंनी असंख्य गोरगरिबांना मदत केली आहे.. त्यांच्याकडे मदत मागणारा कुठल्याही जाती धर्माचा असो ते त्याला न्याय मिळवून देता, गोरगरिबांच्या रोजगारासाठी त्यांनी नाशिक शहरात पीआरपी हॉकर्स युनियनची स्थापना करून भाजी मार्केट, मच्छी मार्केट उभारले आहे. ज्यातून बौद्ध, मराठा, मुस्लिम, आदिवासी, वंजारी, कोळी, मातंग, भील, वाल्मिकी अशा अनेक समाजांच्या लोकांना आज रोजगार मिळतो. तसेच पीआरपी पक्षाचे रिक्षा युनियनचे देखील शहरात जाळे त्यांनी त्यांच्या नेतृत्वात तयार केले आहे.







































