विहितगाव येथील ‘राष्ट्रसंत गाडगेबाबा’ यांच्या पुतळ्यास जयंतीदिनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन..

पोलीस वार्ता, नाशिक : विज्ञानवादी दृष्टिकोन सांगुन बुरसटलेल्या, अंधश्रद्धाळु जनतेला शहाणं करण्याचं काम करणारे थोर समाजसुधारक डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजे राष्ट्रसंत गाडगेबाबा, गाडगे महाराज यांची 149 वी जयंती 23 फेब्रुवारी 2025 ला संपूर्ण देशात साजरी करण्यात आली.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिक येथे राष्ट्रीय नेते जोगेंद्र कवाडे सर व प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या आदेशाने विहितगाव येथील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास जयंतीदिनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पीआरपी नाशिक जिल्हाध्यक्ष ऍड.शशीभाई उन्हवणे व रिपब्लिकन सेनेचे नेते प्रकाश बागुल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पीआरपीचे राज निकाळे, दर्शन पगारे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे चावदास भालेराव, विलास गांगुर्डे, प्रकाश बागुल, रविकांत भालेराव, प्रल्हाद उघडे, कांबळे आदी उपस्थित होते.







































