Homeआरोग्य'राष्ट्रसंत गाडगे महाराज' यांना जयंतीदिनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन!

‘राष्ट्रसंत गाडगे महाराज’ यांना जयंतीदिनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन!

विहितगाव येथील ‘राष्ट्रसंत गाडगेबाबा’ यांच्या पुतळ्यास जयंतीदिनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन..

पोलीस वार्ता, नाशिक : विज्ञानवादी दृष्टिकोन सांगुन बुरसटलेल्या, अंधश्रद्धाळु जनतेला शहाणं करण्याचं काम करणारे थोर समाजसुधारक डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजे राष्ट्रसंत गाडगेबाबा, गाडगे महाराज यांची 149 वी जयंती 23 फेब्रुवारी 2025 ला संपूर्ण देशात साजरी करण्यात आली.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिक येथे राष्ट्रीय नेते जोगेंद्र कवाडे सर व प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या आदेशाने विहितगाव येथील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास जयंतीदिनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पीआरपी नाशिक जिल्हाध्यक्ष ऍड.शशीभाई उन्हवणे व रिपब्लिकन सेनेचे नेते प्रकाश बागुल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पीआरपीचे राज निकाळे, दर्शन पगारे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे चावदास भालेराव, विलास गांगुर्डे, प्रकाश बागुल, रविकांत भालेराव, प्रल्हाद उघडे, कांबळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी गाडगे महाराज यांच्या कार्याचा उजाळा करून देत असताना ऍड.शशीभाई उन्हवणे म्हणाले समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी संत गाडगे महाराज यांनी आपल्या कीर्तनांमधून प्रबोधन केले. मानवता हाच खरा धर्म याची शिकवण आपल्या कृतीतून लोकांना दिली. गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावतीतील अंजन तालुक्यातील सुर्जी गावात धोबी समाजातील एका गरीब कुटुंबात झाला होता. आईचे नाव सखुबाई आणि वडिलांचे झिंगराजी होते. आई वडील त्यांना प्रेमाने डेबूजी म्हणत. मातीच्या भांड्यासारखी भांडी ते नेहमी स्वतः सोबत ठेवत असे. ते त्यात अन्न खाल्ले आणि त्यातून पाणी प्यायले वापरत, मराठीत मातीच्या तुटलेल्या भांड्याला ‘गाडगे’ म्हणतात आणि त्यामुळे बरेच लोक त्याना पुढे गाडगे महाराज आणि गाडगे बाबा म्हणू लागले. पुढे ते संत गाडगे महाराज या नावाने प्रसिद्ध झाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांची विचारांची नाळ जोडलेली होती. त्यामुळे डॉ.आंबेडकर यांचे निधन झाल्यानंतर त्याच साली, त्याच महिन्यात, अवघ्या काही दिवसात गाडगेबाबा यांची प्राणज्योत मावळली. अश्या या थोर समाजसुधारक राष्ट्रसंतास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आणि उपस्थितांच्या वतीने अभिवादन!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!