चोपडा – होमगार्ड पथकातील एक सालस,मन मिळावू व्यक्तीमत् असलेले आबासाहेब कुंदन रघुनाथ बोरसे यांचे ता.१५ रात्री १:३० वाजता अकस्मात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखःद निधन झाले.कै.कुंदन आबा बोरसे एक प्रसन्न, शाली नतेचा,सज्जनतेचा, सोज्वळतेचा आणि चारित्र्याचा एक नैतिक दबदबा असलेले व्यक्तीमत्व होत.
कै.बोरसे आबांनी निःस्वार्थ भावानेन चोपडा होमगार्ड पथकात लासुर होमगार्डच नेतृत्व करत असतांना कधिही कुणाचा हेवादावा न करता दिलेली जबाबदारी स्विकारुन सर्व लासुरचे होमगार्ड कर्मचारी बंधुंना सोबत घेवुन जबाबदारी पार पाडुन आपल्या कामाचा ठसा उमटविला.अशा दमदार व खंबीर नेतृत्वाच्या कै. आबा बोरसे यांना विनम्र भावपुर्ण श्रध्दांजली त्यांच्या दुखःद निधनामुळे त्यांच्या बोरसे परीवाराच्या दुखाःत जळगाव जिल्हा होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनच्या पी.आय कावेरी कमलाकर मॅडम तसेच चोपडा ग्रामिण पो.स्टे.चे सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी,तसेच चोपडा होमगार्ड पथकाचे तालुका समादेशक प्रा.अशोक बोरसे, सर्व होमगार्ड अधिकारी सर्व पुरुष व महिला होमगार्ड बंधु-भगिणी व लासुर गावातील मित्रपरिवार सहभागी असुन परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना..
पोलीस वार्ता प्रतिनिधी भास्कर जाधव


























