चोपड्यातील मूलं अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ ओमीनी गाडीचा अपघात होऊन चोपड्याचे तीन जण जागीच मयत तर चार जण जखमी झाल्याची घटना दिनांक ७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
चोपडा येथील सुंदरगढी येथील शुभम पारधी , लोहिया नगर मधील एक पाटील व शिवाजी नगर मधील एक असे तिघे मयत झाले आहेत. चार जण जखमी आहेत. ज्ञानेश्वर सोनार रा सुरत याला डॉ सुमित सुर्यवंशी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे. एकाला धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर इतर खाजगी दवाखान्यात गेले आहेत.मयत व जखमी हे मंगरूळ येथे केटरर्स चे काम करण्यासाठी आल्याचे समजते.
पोलीस वार्ता प्रतिनिधी विनायक पाटील




































