Homeक्राईमअनैतिक संबंधातून झालेल्या खुनात एका महिलेसह तीन आरोपी गुन्हेशाखा युनिट क्र-1 च्या...

अनैतिक संबंधातून झालेल्या खुनात एका महिलेसह तीन आरोपी गुन्हेशाखा युनिट क्र-1 च्या ताब्यात!

आरोपींनी कबुली दिली की, वसंत सातपुते हा हसीना शेख व साहिल शहा यांच्या प्रेमसंबधात अडथळा निर्माण करत होता..

पोलीस वार्ता, नाशिक | शहरातील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतीतील व्यक्ती वसंत गोरखनाथ सातपुते, वय-40 वर्षे, रा. स्वराज्य नगर, पाथर्डी फाटा, नाशिक हे दि.5 ऑगस्ट 2026 रोजी पासून बेपत्ता झाले होते व त्यांच्या अपहरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार गुरनं.- 440/2026 भा.न्या.सं. कलम 137(2) प्रमाणे इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दाखल गुन्ह्याचा तपास करत असतांना शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट क्र.-1 चे पोह. नाझीमखान पठाण व पोअं. मुक्तार शेख यांना गुप्त बातमी मिळाली की, वसंत सातपुते याचा हसीना शेख व साहिल शहा यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने मिळून खुन केला आहे. तसेच ते सध्या शालीमार परिसरात आहे. मिळालेली माहिती वरीष्ठ शहर गुन्हेशाखा युनिट क्र.-1 चे पोनि. डॉ. अंचल मुदगल यांना दिली असता त्यांनी तात्काळ कारवाईसाठी पथक रवाना केले. संशयितांचा सीबीएस परिसरात पोलिसांनी शोध घेतला असता ते दिसताच त्यांना ताब्यात घेवुन त्याची नावे व पत्ता विचारले. त्यांनी त्यांची नावे..
1) हसीना हबीब शेख, वय-44 वर्षे, रा. स्वराज्य नगर, पाथर्डी फाटा, नाशिक.
2) साहिल रफिक शहा वय-23 वर्षे, रा. म्हाडा वसाहत, ए-७, वडाळा गाव, नाशिक.
3) मोईन मुक्तार शहा, वय-24 वर्षे, रा. नाईकवाडी पुरा, अजमेरी मस्जिद, भद्रकाली, जुने नाशिक.
4) सरफराज अबरार सैय्यद, वय-22 वर्षे, रा. नानावली, गुमशाबाबा चौक, जुने नाशिक.

असे सांगितले. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी पुढे कबुली दिली की, वसंत सातपुते हा हसीना शेख व साहिल शहा यांच्या प्रेमसंबधात अडथळा निर्माण करत होता त्यामुळे दि. 6 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 3 वाजताच्या सुमारास त्याच्या राहते घरी साहिल शहा याच्या मदतीने चाकूने गळा चिरून वसंत सातपुते यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह हा साहील शहा व त्याचा साथीदार मोईन मुक्तार शहा आणि सरफराज अबरार सैय्यद यांनी एका गोणीमध्ये भरून ईरटिंगा गाडीतून नेवुन कसारा घाटात टाकून दिला. त्यानुसार शहर गुन्हेशाखेचे पोउनि. चेतन श्रीवंत, पोउनि. रमीज शेख आणि त्यांच्या पथकाने कसारा घाटात मृतदेह फेकून दिलेल्या ठिकाणी जावून घनदाट जंगलात मृतदेहाचा शोध घेतला त्यावेळी मृतदेह गोणीमध्ये मिळून आला. सदरचा मृतदेह हा पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोउनि. युवराज शिरसाठ करीत आहेत.

सदर कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदिप कर्णिक, शहर (गुन्हे) पो.उपआयुक्त मा. किरणकुमार चव्हाण, सहा. पो.आयुक्त गुन्हेशाखा मा. संदिप मिटके यांच्या आदेशाने शहर गुन्हेशाखा युनिट क्र.-1 च्या पोलीस पथकाकडून मिळून करण्यात आली. पथकात दतात्रय पोटे, श्रेणी.पोउनि किरण शिरसाठ, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, आप्पा पानवळ, उत्तम पवार, अमोल कोष्टी, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, देविदास ठाकरे, मनिषा सरोदे, अनुजा येलवे, राहुल पालखेडे, महेश साळुंके, रोहिदास लिलके, शर्मीला कोकणी, गोरक्ष साबळे, कैलास चव्हाण, योगीराज गायकवाड, श्रीकांत सुर्यवंशी, पोह. सुक्राम पवार, पोअं. समाधान पवार, मसपोनि. जया तारडे, तांत्रिक विश्लेषण विभाग, सेवानिवृत्त पोउनि. दत्तात्रय कडनोर यांचा देखील समावेश होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूर शहर परिसरातील महावितरण संबंधी समस्या सोडवून नागरिकांना चांगल्या सेवा देऊ -सहा.अभियंता सुरेश पाचंगे

भगूर येथील तक्रार निवारण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी सारीका पोरजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. पोलीस वार्ता, देवळाली | पाऊस आणि येणाऱ्या आगामी सण व गणेशोत्सवाच्या...

राजापूर येथे ट्रान्सफॉर्मर फोडून 80 किलो वजनाच्या कॉपर कॉईलची चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल!

चोरट्याने विद्युत पोलवरील 100 kv डीपीचा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील 80 किलो वजनाची कॉपरची कॉईल चोरली.. पोलीस वार्ता, राजापूर | भोर तालुक्यातील राजापूर येथे शेतातील...

सहा पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल देवळाली कॅम्प येथे त्यांचा सत्कार!

पोलीस दलातील धाडसी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने 'राष्ट्रपती पदक' देऊन केले सन्मानित.. पोलीस वार्ता, देवळाली | महाराष्ट्र पोलीस दलातील नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा...

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

28 पंप ऑपरेटरों का प्रशिक्षण संपन्न

0
जिम्मेदारियों एवं तकनीकी कार्यों की दी गई जानकारी रमाकांत मोरे । बुरहानपुर जिले के देड़तलाई। में आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) के अंतर्गत आज...

error: Content is protected !!