Homeक्राईमअल्पवयीन बालिकेचे अपहरण करून विनयभंग ; वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून विनयभंग ; वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल

स्थानिकांच्या सतर्कतेमुळे बालिकेची सुटका; संशयितास ताब्यात घेण्याची कारवाई सुरू

भुसावळ : तालुक्यातील जोगलखेडा येथे साडेचार वर्षीय बालिकेला आमिष दाखवून घरात नेऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १८) उघडकीस आली. या प्रकरणी धनराज दगडू जंजाळे (वय ६५, रा. जोगलखेडा, ता. भुसावळ) याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अपहरण व विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, बालिका सकाळी सुमारे अकरा वाजता घरासमोरील अंगणात खेळत होती. त्यावेळी धनराज जंजाळे हा तिच्याशी बोलताना दिसून आला. काही वेळाने बालिका दिसत नसल्याने तिच्या आईने परिसरात शोध सुरू केला.
दरम्यान, दुकानदार विशाल अण्णा पाटील यांनी बालिका आरोपीसोबत दुसऱ्या गावाच्या दिशेने जाताना पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर विशाल अण्णा पाटील व गजानन सुभाष कोळी यांनी आरोपीच्या घरी जाऊन पाहणी केली. घराचा दरवाजा आतून बंद होता. वारंवार आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने संशय बळावला.

यानंतर आरोपीचा नातेवाईक विलास बाबुराव जंजाळे घटनास्थळी आला. त्याने दरवाजा उघडण्यास सांगितल्यानंतर घराचा दरवाजा उघडण्यात आला. घरातील अंधाऱ्या कोपऱ्यात बालिका आढळून आली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे बालिकेची सुखरूप सुटका करून तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
कुटुंबीयांनी बालिकेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आरोपीने तिला घरात नेऊन दरवाजा बंद केला आणि तिच्याशी गैरवर्तन केल्याचे समोर आले. त्यानंतर कुटुंबीयांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी धनराज दगडू जंजाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिक्षाविधी डीवायएसपी प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे जोगलखेडा परिसरात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूर शहर परिसरातील महावितरण संबंधी समस्या सोडवून नागरिकांना चांगल्या सेवा देऊ -सहा.अभियंता सुरेश पाचंगे

भगूर येथील तक्रार निवारण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी सारीका पोरजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. पोलीस वार्ता, देवळाली | पाऊस आणि येणाऱ्या आगामी सण व गणेशोत्सवाच्या...

राजापूर येथे ट्रान्सफॉर्मर फोडून 80 किलो वजनाच्या कॉपर कॉईलची चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल!

चोरट्याने विद्युत पोलवरील 100 kv डीपीचा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील 80 किलो वजनाची कॉपरची कॉईल चोरली.. पोलीस वार्ता, राजापूर | भोर तालुक्यातील राजापूर येथे शेतातील...

सहा पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल देवळाली कॅम्प येथे त्यांचा सत्कार!

पोलीस दलातील धाडसी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने 'राष्ट्रपती पदक' देऊन केले सन्मानित.. पोलीस वार्ता, देवळाली | महाराष्ट्र पोलीस दलातील नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा...

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

28 पंप ऑपरेटरों का प्रशिक्षण संपन्न

0
जिम्मेदारियों एवं तकनीकी कार्यों की दी गई जानकारी रमाकांत मोरे । बुरहानपुर जिले के देड़तलाई। में आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) के अंतर्गत आज...

error: Content is protected !!