Homeताज्या बातम्याबोगस बियाणे उत्पादक यशोदा सीड्स कंपनीवर कारवाई करा, प्रहारचा केळापूर कृषी विभागाला...

बोगस बियाणे उत्पादक यशोदा सीड्स कंपनीवर कारवाई करा, प्रहारचा केळापूर कृषी विभागाला आंदोलनाचा इशारा!

यशोदा सीड्स कंपनीच्या चमको नामे कापूस बियाणे खरेदी केले होते. हे बियाणे पेरणीच्या 100 ते 150 दिवसांमध्ये पीक देणार होते..

पोलीस वार्ता, वणी : महाराष्ट्रात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट आणि बोगस खते व बियाणे हे आता रोजच्याच घटना झाल्या आहे. तरी देखील सरकारकडून अथवा कृषी मंत्र्यांकडून यावर कुठलीच कठोर कारवाई अथवा उपाययोजना नाही. शेतकऱ्याला नैसर्गिक संकटाबरोबरच या बोगस खते आणि बियाणे यांचा आर्थिक फटका बसत आहे.

नुकताच असा एक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात शेतकऱ्याबरोबर घडला आहे. येथील शेतकरी बोगस बियाणांमुळे मोठ्या अडचणीत सापडले आहे. तालुक्यातील सखी(वाढोना) येथील शेतकऱ्याची हिंगनघाट येथील यशोदा बियाणे कंपनीने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतकरी आकाश खोंडे यांनी खरीप हंगामाकरिता करंजी येथील जिजाऊ कृषी केंद्रातून यशोदा सीड्स कंपनीच्या चमको नामे कापूस बियाणे खरेदी केले होते. हे बियाणे पेरणीच्या 100 ते 150 दिवसांमध्ये पीक देणार होते. असे कृषी केंद्र चालकांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. पीक पेरणी करून आता 90 दिवस लोटूनही फक्त 4-5 फुलोरा/बोंड प्रत्येक झाडाला दिसत आहे. आजुन कापसाचे बोंडच आले नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात यशोदा सीड्स कंपनीला याची माहिती देऊन संबंधित कृषी केंद्र चालकाला विचारपूस केली असता त्यांने उडवाउडवीची उत्तर दिले आहे.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात अश्या बोगस खते व बियाण्यांच्या कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांची सर्हास लूट चालू आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याला आर्थिक फास लावण्याच काम बोगस उत्पादकांबरोबर बोगस विक्रेत्ये देखील करत आहे. इतर कंपन्याप्रमाणेच यशोदा सीड्स कंपनीने देखील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांला कुठलाही मोबदला देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

त्यामुळे शेतकऱ्याने तालुका प्रहार पक्ष संघटनेकडे तक्रार करून घडलेला प्रकार सांगितला. यावर प्रहार पक्ष केळापूर तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हाप्रमुख मोबिन शेख, भोजराज रिंगोले यांच्या उपस्थितीत केळापूर येथील कृषी विभाग अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित यशोदा सीड्स कंपनीवर फौजदारी कारवाई अंतर्गत..
1) अत्यावश्यक वस्तू कायदा 1955, बियाणे कायदा 1966, कीटकनाशके कायदा 1968 नुसार पुरवठादार-विक्रेतावर कारवाई.
2) जिवनावश्यक वस्तु अधिनियम कलम 3, 7(9), 6, 135, 8(अ) व भादंवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखल.
3) बोगस बियाणे वितरित करणाऱ्यांवर (कंपनीचे कर्मचारी) अजामीनपात्र गुन्हा दाखल.
4) बियाणे कायदा 1955 कापूस बियाणे अधिनियम 2009, वजन व मापे कायदा कलम 6 कापूस किंमत कायदा 2025 अंतर्गत व जीवनावश्यक कायदा 1955 नुसार गुन्हा दाखल.
वरील सर्व गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदन केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास प्रहार पक्ष संघटने कडून केळापूर कृषी विभाग कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत घेऊन आमरण उपोषण छेडण्यात येईल. असा इशारा देखील प्रहार पक्षाकडून देण्यात आला आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!