Homeआरोग्यखेळाडूंनी आंतरराष्ट्रीय व जागतिक पातळीवरील खेळांत सहभाग नोंदवून देशाचे नाव उज्ज्वल करावे...

खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय व जागतिक पातळीवरील खेळांत सहभाग नोंदवून देशाचे नाव उज्ज्वल करावे -क्रीडा मंत्री

पारितोषिक नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व स्वर्गीय सुरेखाताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनीच्या वतीने दिले जाणार..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हा विभागीय क्रीडा संकुल आयोजित शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सन 2025-26 चे उद्घाटन 15 नाव्हेंबर रोजी क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार क्रीडामंत्र्यांनी केला, क्रीडा मंत्री म्हणाले की, देशी खेळांना अधिक प्राधान्य देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहेत. खेळाडूंना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. मैदानी खेळांसोबतच इन-डोअर खेळांसाठी क्रीडा सभागृह उभारणे आवश्यक आहे. यासाठीचा क्रीडा विभागाने प्रस्ताव तयार करून सादर करावा. तसेच नाशिक येथील खेळाडूंच्या वसतिगृहाच्या दुरूस्तीसाठी देखील आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा ह्या सूचना मंत्री महोदयांनी विभागाला दिल्या.
खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडूंना निवासी प्रशिक्षण दिले जाते व त्यातून उत्तम खेळाडू तयार होत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. खेळाडूंनी चांगला सराव व उत्तम खेळातून पुढे जात आंतरराष्ट्रीय व जागतिक पातळीवरील खेळांत सहभाग नोंदवून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा मंत्री ॲड.कोकाटे यांनी विद्यार्थी खेळाडूंना दिल्या.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत दरवर्षी 92 खेळ प्रकरांच्या स्पर्धांचे तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोजन केल्या जातात. 19 वर्षाआतील मुले व मुली खेळाडुंच्या खो- खो क्रीडा स्पर्धा 15 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होत आहेत. या स्पर्धांमध्ये प्रत्येक विभागातून प्रत्येकी 30 खेळाडूंचा संघ व निवड चाचणीसाठीचे खेळाडू मुले व मुली आणि 8 विभागातून एकूण 340 खेळाडू सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन करणाऱ्या संघास अनुक्रमे रूपये 5 हजार, 3 हजार व 2 हजार रोख व पारितोषिक नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व स्वर्गीय सुरेखाताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनीच्या वतीने दिले जाणार आहे. यासह स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात येणार असल्याचे उपसंचालक श्रीमती साळुंखे यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, शिवछत्रपती पुरस्कार्थी अशोक दुधारे, जिल्हा क्रीडा अधिकारी (जळगाव) तथा विशेष कार्यकारी अधिकारी रवींद्र नाईक, ऑलिम्पियन दत्तू भोकनळ, आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी संजीवनी जाधव, अविनाश टिळे, सर्वेश देशमुख, शिवप्रसाद घोडके, निवड समिती सदस्य राजेंद्र साप्ते, श्वेता गवळी, निकिता पवार, प्रिती करवा, दिगंबर वेरणेकर, महेश पलांडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू भूमिका नेहते, रेश्मा राठोड, नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे मंदार देशमुख, उमेश आटवणे, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे राजेंद्र वानखेडे यांच्यासह क्रीडा अधिकारी, क्रीडा शिक्षक व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!