Homeउद्योगजिल्ह्यातील 1 एप्रिल 2019 पुर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य!

जिल्ह्यातील 1 एप्रिल 2019 पुर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य!

होणारे गुन्हे कमी करणे तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे 15 ऑगस्ट 2025 पर्यंत बंधनकारक होते. अद्यापही बऱ्याच वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे बाकी आहे. वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयाच्या 14 ऑगस्ट 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 पर्यत मुदवाढ देण्यात आली असून, जिल्ह्यातील 1 एप्रिल 2019 पुर्वीच्या वाहनांच्या वाहनधारकांनी विहित मुदतीत नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केले आहे.
वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी M/s. FTA HSRO solutions pvt. Ltd ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे. वाहनधारकांनी http://maharashtrahsrp.com अथवा http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळवार अर्ज करून आपल्या वाहनास HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या ज्या वाहनांना HSRP नंबर प्लेट 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत न बसविल्यास अशा वाहनांचे मालकी हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (RC) पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे/ उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे इत्यादी वाहन विषयक कामे HSRP नंबर प्लेट बसविल्याशिवाय करण्यात येणार नाहीत. तथापि ज्या वाहन मालकांनी HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी नियोजित वेळ व दिनांक घेतला असल्यास त्याची पावती उपरोक्त कायदपत्रांसोबत जोडल्यास त्यांच्या वाहनांचे पुढील कामकाज करण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विभागीय आयुक्त कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | देशात 80...

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

error: Content is protected !!