राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते महाराष्ट्र सरकार मधील माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या; मुंबईत कार्यालया बाहेर 3 अज्ञातांकडून 3 गोळ्या मारल्या गेल्या.
मुंबई, बांद्रा येथील खैरवाडी सिग्नल जवळ त्यांच्या मुलाचे जीशान सिद्दीकी च्या कार्यालयाच्या बाहेर त्यांच्यावर 3 गोळ्या राऊंड फायर केल्या गेल्या. एक गोळी त्यांच्या छातीत लागली तर इतर दोन गोळ्या पोटात लागल्या त्यांना लगेच लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे त्यांनी दम सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी शनिवारी रात्री 9.15 वाजे दरम्यान कार्यालयातून निघाले होते. गोळ्या चालण्याच्या वेळेस ते त्यांच्या कार्यालयाजवळ फटाके फोडत होते. तेव्हाच एक रिक्षा तिथे आली. दोन-तीन जण त्यातून बाहेर आले. तिघांनी चेहरे झाकलेले होते. त्यांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन राऊंड गोळ्या फायर केल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. हल्ल्याचे कारण अजून अस्पष्ट असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, दोन आरोपी पकडले गेले आहे. यातील एक आरोपी उत्तर प्रदेश तर दुसरा हरियाणातला आहे. तिसरा आरोपी अजून फरार आहे. हल्लेखोरांना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. हल्ल्याप्रकरणी लॉरेंस बिश्नोई गॅंगचा संबंध असल्याचे वृत्त येत आहे. या घटनेची माहिती मिळताच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हॉस्पिटलला पोहोचले. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे देखील आपले सर्व कार्यक्रम रद्द करून हॉस्पिटलकडे निघाले आहेत.
पोलीस वार्ता न्यूज- दिनेश पाटील,ठाणे





































