शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/BLO व पर्यवेक्षक दिवसभर मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदारांना मार्गदर्शन करतील..

पोलीस वार्ता, नाशिक | मतदान यादी पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील मतदारांचे अर्ज (Enumeration Form) भरण्याची प्रक्रिया ही दिनांक 17 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहणार असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी शहरातील 123- नाशिक पूर्व, 124 – नाशिक मध्य, 125 – नाशिक पश्चिम, 126 – देवळाली मतदारसंघांमध्ये 8 व 9 ऑगस्ट 2026 म्हणजे शनिवार व रविवार या कालावधीत सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.मधुमती सरदेसाई यांनी दिली आहे.
शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/BLO व पर्यवेक्षक दिवसभर आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदारांना मार्गदर्शन करतील. ऑनलाइन सुविधा वापरणे शक्य असलेल्या मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Fill Enumeration form या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर स्वतःचा मोबाईल नंबर किंवा एपिक क्रमांक आणि कॅप्चा टाकावा. त्यानंतर प्राप्त ओटीपी भरुन लॉगीन करावे. आपल्या राज्याचे नाव व EPIC कार्ड क्रमांक टाकून सर्च करावे आणि गणना पत्रक तपासून submit करावे. घरबसल्या Self Enumeration करून आपला Enumeration Form भरावा. तसेच कुटुंबातील तरुणांनी व तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या सदस्यांच्या इतर कुटुंबीयांनाही ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करावी.




































