Homeमनोरंजनगणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय चौधरी यांची १६ वर्षीय मुलगी गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभी होती. त्यावेळी चेतन ललित झोपे (वय ३०) याने तिच्याशी वाद घालत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत मुलगी बेशुद्ध झाल्याने तिला तातडीने भुसावळ येथील लोकेश नेहते यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, घटनेनंतर चेतन झोपे यालाही जमावाकडून मार लागल्याची माहिती आहे. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून जमावाला शांत केले. त्यानंतर मिरवणूक पुन्हा शांततेत मार्गस्थ करण्यात आली. संबंधितांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर काही काळ न्हावी परिसरात तणावाचे वातावरण होते. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू आहे.
वृत्त लिहीपर्यंत या घटनेप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती आहे. मारहाणीचे नेमके कारण, घटनेची वस्तुस्थिती आणि पुढील पोलिस कारवाई याबाबत अधिकृत नोंदीनंतरच स्पष्टता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

0
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...

गीता गुप्ता को श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट जयपुर की राष्ट्रीय प्रचार मंत्री नियुक्त...

0
(रमाकांत मोरे) श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट के राष्ट्रीय अध्यक्ष विकास चंद्र जी अग्रवाल ने राष्ट्रीय स्तरीय महिला मोर्चा का विस्तार करते हुए श्री...

हरसूद पुलिस की शराब परिवहन पर कार्रवाई

0
61.8 लीटर शराब के साथ दो आरोपी गिरफ्तार हरसूद पुलिस ने अवैध रूप से शराब का परिवहन करते दो आरोपियों को गिरफ्तार कर 61 लीटर...

बुरहानपुर में अखंड दीप जन्म शताब्दी 2026

0
10,000 पीले वस्त्रधारियों और वीरांगनाओं की भव्य शोभायात्रा से गूंजा शहर, 24 स्थानों पर प्रज्वलित हुए दीप बुरहानपुर ( रमाकांत मोरे) शान्तिकुंज हरिद्वार के तत्वावधान में परम...

ग्राम बदनापुर नेपानगर में इंटीग्रेटेड स्वास्थ्य शिविर हुआ

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अरुणोदय सर्वेश्वरी लोक कल्याण समिति द्वारा शनिवार 19 सितंबर को मध्य प्रदेश राज्य एड्स नियंत्रण भोपाल के सहयोग से और डॉक्टर राजेंद्र कुमार...

error: Content is protected !!