मतदारांना स्वत:ची माहिती अद्ययावत करण्याची तसेच नवीन छायाचित्र उपलब्ध करून देण्याची सुविधा असणार आहे..
पोलीस वार्ता, नाशिक : भारत निवडणूक आयोगाने भारतीय संविधानातील कलम 324 अंतर्गत 24 जून 2025 रोजी देशभरातील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revisin) करण्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील 51 लाख 28 हजार मतदारांच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून ही प्रकिया जून ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे.
वाढते शहरीकरण, स्थलांतर तसेच मतदार याद्यांमधील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे किंवा चुकीच्या नोंदी यामुळे मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील 4 हजार 919 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेट देवून पूर्ण भरलेले गणना पत्रक मतदारांना वितरीत करतील. भरलेले अर्ज पुन्हा संकलित करतील. या पत्रात मतदाराची सध्याची माहिती तसेच उपलब्ध असल्यास 2002-04 मधील विशेष पुनरिक्षणातील जुनी नोंद समाविष्ट असेल. मतदारांना आवश्यक असल्यास स्वत:ची माहिती अद्ययावत करण्याची तसेच नवीन छायाचित्र उपलबध करून देण्याची सुविधा असणार आहे.





























