Homeउद्योगभुसावळ शहरातून चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक जण फरार..

भुसावळ शहरातून चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक जण फरार..

स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांच्या कारवाईत शहरातील मोहल्ला परिसरातून चोरीच्या तीन दुचाकी जप्त..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील इराणी मोहल्ला परिसरात लपवून ठेवलेल्या चोरीच्या तीन दुचाकी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने कारवाईत जप्त केल्या आहेत. या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार झाला आहे.
स्थानिक गुन्हेशाखेचे पोउपनि. रवि नरवाडे यांच्या मार्गदर्शनात पथक दि.6 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता दरम्यान शहरातील इराणी मोहल्ला, रजा टॉवर या परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी एका घराच्या आडोशाला संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या तीन मोटारसायकली आढळून आल्या. संबंधित वाहनांच्या मालकांचा शोध घेतला असता कोणीही समोर आले नाही. यानंतर पोलिसांनी तीनही दुचाकी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या चेसिस व इंजिन क्रमांकाच्या आधारे तपास केला. तपासादरम्यान या तिन्ही मोटारसायकली अनुक्रमे मुक्ताईनगर, चोपडा शहर व तोफखाना (अहिल्यानगर) पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यांतील असल्याचे निष्पन्न झाले. या जप्त करण्यात आलेल्या दुचाकी 1)पल्सर (एमएच-19 ईएस-3555), 2)पल्सर एन-160 (एमएच-19 ईटी-3380) तसेच 3)केटीएम ड्यूक 250 (एमएच-16 डीटी-7433) आहे. तब्बल 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या गुन्ह्यात हसनअली उर्फ आशु नियाजअली इराणी, रा- इराणी मोहल्ला, भुसावळ याला अटक करण्यात आली असून सलमान अली हुजूरअली इराणी हा आरोपी फरार झाला आहे. दोघांनी मिळून या दुचाकी चोरी करून त्या लपवून ठेवल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोअधी. अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, गुन्हेशाखेचे वपोनि. राहुल गायकवाड तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोनि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक पीएसआय रवि नरवाडे, पोलीस कर्मचारी गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे तसेच बाजारपेठ गुन्हे शाखेचे भूषण चौधरी, योगेश माळी, प्रशांत सोनार यांच्याकडून करण्यात आली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!