Homeउद्योगयावल-टाकरखेडा मार्ग वर भीषण अपघात

यावल-टाकरखेडा मार्ग वर भीषण अपघात

एसटी बसची ईको कारला जोरदार धडक; १०-१२ विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

  1. यावल – तालुक्यात आज सकाळी भीषण रस्ता अपघात घडून १० ते १२ शालेय विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) बसने विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या ईको कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
    अपघात कसा घडला?
    सकाळी साडेसातच्या सुमारास एमएच ४० एन ९८४५ क्रमांकाची यावल-टाकरखेडा मार्गावरील एसटी बस भालशिव पिंप्री फाट्यावरून जात असताना, एमएच ३७ जी ६६८० क्रमांकाची ईको कार समोरून येत होती. सदर कार यावलमधील एका खासगी शाळेकडे विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ईको कारमधील चालकासह विद्यार्थ्यांना गंभीर दुखापती झाल्या.
                                                            जखमींवर  उपचार
  2. अपघातानंतर जखमींना तातडीने यावल ग्रामीण7 रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले. गंभीर जखमी दोन विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
    घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे. अपघातग्रस्त ईको कार जप्त करण्यात आली आहे.
  3. परिसरात खळबळ
  4. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. बोरावल परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य केले. पालकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. एसटी बसचे चालक ए. ए. तडवी व वाहक एस. एम. पाटील असल्याची माहिती मिळाली आहे.
  5. अवैध वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर
    या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. छोट्या वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवून वाहतूक केली जाते, सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे आरोप होत आहेत. संबंधितांवर कडक कारवाई करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
    दरम्यान, पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधले जात असून दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!