Homeक्राईमबोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा

भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणी विशेष जलद न्यायालयाने गुरुवारी ऐतिहासिक निकाल देत आरोपी महेंद्र बारेला याला दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि चार बालकांच्या हत्येप्रकरणी स्वतंत्रपणे फाशीची शिक्षा ठोठावत न्यायालयाने हा गुन्हा ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले.

विशेष न्यायाधीश एस. आर. यादव यांनी १०४ पानी सविस्तर निकालात आरोपीच्या क्रौर्याचा कठोर शब्दांत उल्लेख केला. “जसा लाकूडतोड्या निर्दयीपणे लाकूड तोडतो, त्याच पद्धतीने आरोपीने निष्पाप बालकांची हत्या केली,” असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीच्या अमानुष वर्तनावर ताशेरे ओढले.

न्यायालयात थरारक वातावरण

दुपारी १.०५ वाजता विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम न्यायालयात दाखल झाले. आरोपी महेंद्र बारेला आणि त्याचे वकील अ‍ॅड. सत्यनारायण पाल यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने शिक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितल्यानंतर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यानंतर न्यायाधीशांनी सुमारे १७ मिनिटे निकालाचे वाचन करत शिक्षेची कारणमीमांसा स्पष्ट केली.

वैज्ञानिक पुराव्यांची भक्कम साखळी

या खटल्यात एकूण २८ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही डीएनए अहवाल, रक्तनमुने, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्धची साखळी सिद्ध करण्यात आली. अत्याचारग्रस्त मुलीच्या शरीरावरील नमुन्यांशी आरोपीचा डीएनए जुळल्याने गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.तसेच गुन्ह्यानंतर आरोपीने आपल्या वडील आणि काकांना भ्रमणध्वनीवरून दिलेली कबुलीही तपासातील महत्त्वाचा दुवा ठरली. त्यांच्या साक्षीमुळे अभियोजन पक्षाचा दावा अधिक भक्कम झाला.

निकम यांचा प्रभावी युक्तिवाद

विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडली. आरोपीकडून समाजासाठी गंभीर धोका निर्माण झाल्याचे नमूद करत त्यांनी ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ तत्त्वानुसार फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ती मान्य केली.

दंडासह अतिरिक्त शिक्षा

फाशीच्या शिक्षेबरोबरच आरोपीला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास तीन वर्षांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
इतिहासातील पहिला निर्णय
सन २०१४ मध्ये स्थापन झालेल्या भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने हा निकाल ऐतिहासिक ठरला आहे.

निकालानंतर जल्लोष

निकालाची माहिती समोर येताच न्यायालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत अ‍ॅड. उज्वल निकम यांचे अभिनंदन केले. दरम्यान, आरोपी महेंद्र बारेला याने ही शिक्षा अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया दिली.

चार निष्पाप बालकांच्या हत्येने हादरलेल्या समाजाला अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, या कठोर शिक्षेमुळे गंभीर गुन्हे करणाऱ्यांना ठोस संदेश मिळाल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!