भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर – वेल्हा – मुळशी मतदारसंघाचे आधारस्तंभ अनंतराव थोपटे यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
अनंतराव थोपटे यांची कारकीर्द ही संघर्षातून आणि लोकसेवे तून आकाराला आली होती. अनंतराव थोपटे हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि प्रशासनावरील पकडीसाठी ओळखले जात. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्याच्या नियोजन आराखड्याला नवी दिशा दिली. शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न विधानसभेत मांडताना त्यांच्या अभ्यासू मांडणीचा दरारा विरोधकांवरही असायचा.
कॉंग्रेस पक्षाने एक असा नेता गमावला आहे, ज्याने प्रतिकूल परिस्थितीतही ‘निष्ठा’ काय असते, हे आपल्या कृतीतून सिद्ध केले .


































