राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यात येईल..
पोलीस वार्ता, नाशिक : अवकाळी पावसामुळे दिंडोरी तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज दि.3 नोव्हेंबर रोजी सकाळी केली. जानोरी, कोरटे येथे पावसामुळे शेत पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी नानाजी भोये, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार आदी जण उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकसानीची माहिती देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. केंद्र सरकारचे देखील पथक नुकसानीची पाहणी करणार आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाई मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत. लवकरच नुकसानीचा अहवाल प्राप्त होणार असून सदरचा अहवाल शासनास सादर करण्यात येईल. असे नाशिकचे नवीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे.
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...