Homeआरोग्यमुख्यमंत्री शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहे, मंत्री छगन भुजबळ यांनी नुकसानीच्या पाहणी...

मुख्यमंत्री शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहे, मंत्री छगन भुजबळ यांनी नुकसानीच्या पाहणी दौऱ्यादरम्यान सांगितले

येवला तालुक्यातील गवंडगाव, रस्ते सुरेगाव, पिंपळखुटे खुर्द, वाघाळे तसेच निफाड तालुक्यातील कोटमगाव व वनसगाव नुकसानींची पाहणी..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या अतिरिष्टीमुळे शेतशिवरात झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा सद्या राज्यातील मंत्री आणि आमदार हे करत आहे. ज्यामुळे लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे दिसत आहे. जिह्यात येवला व निफाड तालुक्यात देखील अतिवृष्टीचा फटका बसला असून कुठे शेत जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत, या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दि.25 सप्टेंबर 2025 रोजी येवल्याचे आमदार व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या शेतशिवरात जाऊन पाहणी दौरा पूर्ण केला.
येवला तालुक्यातील गवंडगाव, रस्ते सुरेगाव, पिंपळखुटे खुर्द, वाघाळे तसेच निफाड तालुक्यातील कोटमगाव व वनसगाव आणि मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून भरण्यात आलेला डोंगरगाव साठवण तलावाची पाहणी करण्यात आली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड तहसीलदार आबा महाजन, निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडी, गट विकास अधिकारी संदीप वायाळ, गट विकास अधिकारी नम्रता जगताप, येवला ता.कृषी अधिकारी शुभम बेरड, निफाड ता.कृषी अधिकारी सुधाकर पवार, मंडळ अधिकारी रूपाली साळवे, ग्राम महसूल अधिकारी भारत नागरे, यांच्यासह इतर अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ अधिकाऱ्यांना सूचना देताना म्हणाले की, अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या मका, सोयाबीन, कांदा, द्राक्षबागा, भुईमुग, टोमॅटो, भाजीपाला यासह विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानीचे पंचनामे मोहीम स्तरावर करण्यात यावेत. तसेच एकही बाधित शेतकरी वंचित राहता कामा नये. ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही तेथील अधिकाऱ्यांची मदत आवश्यक असल्यास घेण्यात यावी.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची घोषणा केली आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने देखील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. बाधित शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपाची मदत सुरू करण्यात आली असून प्रत्येकी 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू अशा स्वरूपात अन्नधान्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
आवश्यक त्या ठिकाणी आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय सेवा देखील पुरविण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. ‘बळीराजाने धीर धरावा, खचून जाऊ नये’ अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी बाधित शेतकऱ्यांना धीर व पाठबळ दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!